अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील ट्वेन्टी२० वर्ल्डकपचा सामना धुवाधार पावसामुळे रद्द झाला आणि पाकिस्तानच्या सुपर८ फेरी गाठण्याच्या आकांक्षांवर पाणी फेरलं गेलं. गटवार लढतीत नवख्या अमेरिकेकडूनच पाकिस्तानचा अनपेक्षित पराभव झाला होता. त्या पराभवातून पाकिस्तानचा संघ सावरलाच नाही. पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्धच्या थरारक लढतीतही त्यांचा पराभव झाला आणि त्यांच्या सुपर८च्या आशा मावळू लागल्या. अमेरिका-आयर्लंड सामन्यावर पाकिस्तानचं पुढच्या फेरीचं स्वप्न अवलंबून होतं. मात्र पावसामुळे ही लढत होऊच शकली नाही. पंचांनी सातत्याने मैदानाची पाहणी केली. मात्र मैदान खेळण्यायोग्य नसल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेने सलामीच्या लढतीत कॅनडावर ७ विकेट्सनी विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्धची त्यांची लढत टाय झाली. मात्र सुपर ओव्हरमध्ये त्यांनी बाजी मारली. बलाढ्य भारतीय संघालाही त्यांनी टक्कर दिली पण त्यांना विजय मिळवता आला नाही. आयर्लंडविरुद्धची लढत रद्द झाल्याने अमेरिकेचे ४ सामन्यांनंतर ५ गुण झाले आणि सुपर८ फेरीतला प्रवेश पक्का झाला.

Basit Ali on BCCI and ICC Over Champions Trophy 2025
“Jay Shah म्हणतील तसंच ते करतात”, माजी पाकिस्तानी क्रिकेटरचे ICCवर मोठे वक्तव्य; “म्हणाले, BCCI कडे खूप पैसा म्हणून…”
Warner had conceded that he was open to the idea of one last dance with the ODI team in the Champions Trophy next year in Pakistan.
David Warner : ‘…म्हणून डेव्हिड वॉर्नरला संघातून वगळले’, मुख्य निवडकर्त्याने सांगितले कारण
Copa America football tournament Brazil challenge ends
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा: ब्राझीलचे आव्हान संपुष्टात
Pakistan beats Indian champions by 68 runs
लेक आणि जावयासमोर शाहिद आफ्रिदीचा शानदार खेळ, पाकिस्तानची भारतीय चॅम्पियन्सवर ६८ धावांनी मात
South Africa Reached Finals of T20 World Cup For the First Time in History
South Africa in Final: दक्षिण आफ्रिकेचं ‘सेमी’ सीमोल्लंघन; अफगाणिस्तानचा धुव्वा उडवत पहिल्यांदाच फायनलमध्ये
South Africa vs Afghanistan, T20 World Cup semi-final
T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेला अफगाणिस्तान रोखणार?उपांत्य फेरीच्या लढतीत आज आमनेसामने
taliban minister talk to rashid khan
T20 World Cup : रशीद खानच्या शिलेदारांचं तालिबानी नेत्याने केलं कौतुक; अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केला व्हिडीओ
Afghanistan beats Bangladesh by 8 runs in Marathi
Afghanistan vs Bangladesh: अफगाणिस्तानने घडवला इतिहास; बांगलादेशला हरवत सेमी फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलिया माघारी

अ गटातून भारत आणि अमेरिकेचा संघ सुपर८ फेरीत दाखल झाला आहे. पाकिस्तान, आयर्लंड यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. ब गटातून ऑस्ट्रेलियाने सुपर८ फेरी गाठली आहे. दुसऱ्या स्थानासाठी इंग्लंडचा संघ दावेदार आहे. क गटातून वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानने दिमाखात सुपर८ फेरीत वाटचाल केली आहे. अफगाणिस्तानच्या झंझावातामुळे न्यूझीलंडसारख्या मोठ्या संघाला गाशा गुंडाळावा लागला आहे. ड गटातून दक्षिण आफ्रिकेने सुपर८ फेरीत आगेकूच केली आहे. दुसऱ्या स्थानासाठी बांगलादेश आणि नेदरलँड्स यांच्यात चुरस आहे. या गटातून श्रीलंकेवर परतीची वेळ ओढवली आहे.

२००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने फायनलमध्ये धडक मारली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने त्यांना हरवत जेतेपदाची कमाई केली. दोनच वर्षात झालेल्या चुकातून शिकत सुधारत पाकिस्तानने टी२० वर्ल्डकपच्या जेतेपदावर कब्जा केला. त्यानंतर २०१० आणि २०१२ स्पर्धेत त्यांनी सेमी फायनलमध्ये आगेकूच केली होती. २०१४ आणि २०१६ मध्ये त्यांचं आव्हान दुसऱ्या फेरीतच आटोपलं. पाच वर्षानंतर २०२१ मध्ये पुन्हा एकदा त्यांनी सेमी फायनलमध्ये मुसंडी मारली. २०२२ स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. यंदा मात्र अंतर्गत बंडाळ्यांनी ग्रस्त पाकिस्तान संघाला प्राथमिक फेरीतूनच परतावं लागणार आहे.

पाकिस्तानचा टी२० वर्ल्डकपमधला प्रवास
२००७- उपविजेते
२००९- विजेते
२०१०- सेमी फायनल
२०१२- सेमी फायनल
२०१४- दुसरी फेरी
२०१६- दुसरी फेरी
२०२१- सेमी फायनल
२०२२- उपविजेते
२०२४- प्राथमिक फेरी