Pakistan Cricket Team in T20 World Cup 2024: पाकिस्तानचा संघ गट सामन्यांमध्येच यंदाच्या टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. अमेरिका वि आयर्लंडमधील सामना रद्द झाल्याने पाकिस्तानला स्पर्धेत बाहेर पडण्याची वेळ आली. पाकिस्तानला अमेरिकेविरूद्ध मोठ्या लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यानंतच्या भारताविरूद्धच्या सामन्यातही पाकिस्तानचा संघाने सहज विजय साकारता येईल असा सामना गमावल्याने जोरदार टीका झाली. यानंतर संघाच्या माजी खेळाडूनेच पाकिस्तानी संघात गटबाजी असल्याचे उघडकीस आणले. आता पीसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीमध्ये संघातील गट बनणं पाकिस्तानला महागात पडल्याचं म्हटलं आहे.

वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानच्या टी-२० विश्वचषकातून अनपेक्षितपणे लवकर बाहेर पडल्यामुळे संघातील गटबाजी आणि वरिष्ठ खेळाडूंच्या खराब कामगिरीबद्दल चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यांमुळे केवळ संघातच नव्हे तर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) मध्येही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्णधार म्हणून संघाला एकत्र बांधून ठेवणं हे बाबर आझमचं काम होतं पण त्यात तो कमी पडला.

Taskin Ahmed was punished for sleeping
भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी झोपणं बांगलादेशच्या खेळाडूला पडलं महागात, संघाने दिली मोठी शिक्षा, आता मागतोय माफी
AFG Coach Slams ICC After SA Victory
“स्वतःला अडचणीत आणायचं नाही पण..”, अफगाणिस्तान उपांत्य फेरीतून बाद होताच प्रशिक्षक ICC वर भडकले; म्हणाले, “पीच पूर्णपणे..”
Rashid Khan Emotional Post SA vs AFG
५६ धावांसह अफगाणिस्तान विश्वचषकातून बाहेर! भावूक होत कर्णधार रशीद खान म्हणाला, “चांगली कामगिरी करता आली असती..”
South Africa vs Afghanistan, T20 World Cup semi-final
T20 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेला अफगाणिस्तान रोखणार?उपांत्य फेरीच्या लढतीत आज आमनेसामने
Ian Smith Hilarious Reaction on Gulbadin Naib Fake Injury
“मी गुडघेदुखीसाठी गुलबदीनच्या डॉक्टरकडे जाईन…” इयान स्मिथचं अफगाणिस्तान खेळाडूच्या ‘खोट्या’ दुखापतीवर भन्नाट वक्तव्य
Gulbadin Naib fake injury
AFG v BAN: दुखापतीचा बनाव अफगाणिस्तानच्या गुलबदीनच्या अंगलट येणार? आयसीसीचे नियम काय सांगतात?
taliban minister talk to rashid khan
T20 World Cup : रशीद खानच्या शिलेदारांचं तालिबानी नेत्याने केलं कौतुक; अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केला व्हिडीओ
Afghanistan vs Bangladesh
अफगाणिस्तानची निराशाजनक फलंदाजी, दणदणीत पराभव होऊनही ऑस्ट्रेलियाच्या आशा पल्लवित

हेही वाचा – गिलने रोहित शर्माला केलं अनफॉलो? शिस्तभंग केल्याने वर्ल्डकप संघातून शुबमनला रिलीज करणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

कर्णधारपद गमावल्याने शाहीन शाह आफ्रिदी नाराज आहे आणि तर मोहम्मद रिझवानला कर्णधारपदासाठी विचारात न घेतल्याने तो नाराज आहे. संघातील एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “संघात तीन गट आहेत, एकाचे नेतृत्व बाबर आझम, दुसऱ्या गटाचे नेतृत्व शाहीन शाह आफ्रिदी आणि तिसऱ्या गटाचे नेतृत्व रिजवानकडे आहे. या सगळ्यात मोहम्मद आमिर आणि इमाद यांच्या पुनरागमनामुळे संघाची परिस्थिती आणखी बिघडली.

“इमाद आणि आमिरच्या संघातील पुनरागमनामुळे गोंधळात आणखी भर पडली, कारण बाबरला या दोघांकडून अपेक्षित अशी कामगिरी करवून घेणं कठीण होतं. या दोघांनीही फ्रँचायझी लीग वगळता गेल्या बऱ्याच काळापासून देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेलं नाही.” अशीही उदाहरणे आहेत की काही खेळाडू एकमेकांशी बोलत नव्हते आणि त्यांच्यापैकी काहींनी संघाच्या तीन गटांचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंना खूश करण्याचा प्रयत्न केला,” असे त्या सूत्राने पुढे सांगितले.

हेही वाचा – IND vs USA: “तू सूर्यकुमारला का आऊट नाही केलंस?”, नवज्योत सिंग सिद्धूने विचारलेल्या प्रश्नावर नेत्रावळकरने दिले उत्तर; म्हणाला- ‘त्याचा झेल…’

पीसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना विश्वचषकापूर्वीच संघातील समस्यांची चांगलीच जाणीव होती. त्यांचा जवळचा मित्र आणि राष्ट्रीय निवडकर्ता वहाब रियाझने त्यांना याबाबत माहिती दिली होती. ते म्हणाले, “नक्वी यांनी सर्व खेळाडूंसोबत दोनदा वन-ऑन-वन ​​मीटिंग्स केल्या आणि वैयक्तिक मुद्दे बाजूला ठेवत विश्वचषक जिंकण्यावर भर देण्यास सांगितले. विश्वचषकानंतर संघातील सर्व गैरसमज दूर करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. पण प्रत्यक्षात याचा काहीच उपयोग झाला नाही.”

हेही वाचा – T20 WC 2024: ट्रेंट बोल्टच्या वक्तव्याने सर्वांनाच दिला धक्का, या दिवशी न्यूझीलंडकडून खेळणार अखेरचा वर्ल्डकप सामना

सूत्राने पुढे सांगितले की, “मी बाबरचा बचाव करत नाही, पण जेव्हा तुमचा प्रमुख गोलंदाज अमेरिकेसारख्या कमकुवत संघाविरुद्ध शेवटच्या षटकात १५ धावाही वाचवू शकत नाही आणि फुल टॉस चेंडू टाकून धावा देत असेल तर कर्णधाराने काय करावे? निवृत्तीनंतर माघार घेत संघाला विश्वचषक जिंकवण्यात मदत करण्यासाठी परतलेला अष्टपैलू खेळाडू फिटनेसच्या समस्येमुळे संघाबाहेर बसावे लागते, यावेळी कर्णधार काय करणार?”

पीसीबीच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या संघातील अंतर्गत कलहांमुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.