T20 World Cup 2024: भारतीय संघाने टी २० विश्वचषक स्पर्धेत आयर्लंडवर विजय मिळवला. आता भारताचा पुढचा सामना पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. यानंतर काहीश्या रिलॅक्स मूडमध्ये असलेले टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना न्यूयॉर्कमध्ये आदरांजली वाहिली. कोलंबिया विद्यापीठातले फोटो व्हायरल अजित आगरकर आणि राहुल द्रविड या दोघांनीही बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. कोलंबिया विद्यापीठातले या दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत. विशाल मिश्रा नावाच्या एका नेटकऱ्याने हे फोटो पोस्ट केले आहेत. द्रविड आणि आगरकर या दोघांनीही बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि आदर व्यक्त केला अशा ओळी विशाल मिश्रा यांनी लिहिल्या आहेत. या दोघांचाही हा फोटो व्हायरल होतो आहे. राहुल द्रविडने डेनिम कलरचा टीशर्ट घातल्याचं दिसतं आहे. तर अजित आगरकरने टीशर्ट आणि जॅकेट घातल्याचं या फोटोंत दिसतं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर या दोघांनीही त्यासमोर उभं राहात फोटो काढले आहेत. जे चांगलेच व्हायरल झाले आहेत. या दोघांचाच कोलंबिया विद्यापीठाबाहेरचा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे. यात राहुल द्रविड अजित आगरकरच्या खांद्यावर हात ठेवून उभा आहे असं दिसतं आहे. टीम इंडियामध्ये गौतम गंभीरला पुन्हा संधी? राहुल द्रविडचा उत्तराधिकारी होण्याची जोरदार चर्चा राहुल द्रविड निवृत्त होणार या टी २० विश्वचषक स्पर्धेनंतर राहुल द्रविड टीम इंडियाबरोबर असणार नाही. त्याने मुख्य प्रशिक्षकाच्या जबाबदारीतून स्वतःला मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच झाला होता. त्याने रवी शास्त्रींकडून या पदाची सूत्रं हाती घेतली होती. भारताने द्रविडच्या कार्यकाळात १७ पैकी १४ टी २० मालिका जिंकल्या आहेत. तसंच १४ पैकी १० वन डे मालिका आणि ८ पैकी ६ कसोटी मालिका भारतीय संघाने जिंकल्या आहेत. रोहित शर्मा भावूक राहुल द्रविडच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे रोहित शर्मा भावूक झाला. रोहित म्हणाला, "राहुल पहिला आंतरराष्ट्रीय कर्णधार होता. आम्ही त्याला खेळताना पाहिलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने संघासाठी बरंच काम केलं आहे. राहुल बरोबर असताना आम्ही जवळपास सर्व स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे. जिंकण्यासाठी काय करायचं? हे आम्हाला त्याने शिकवलं. त्याला निरोप देताना मला खूप वाईट वाटणार आहे." असं रोहित शर्माने म्हटलंय.