Rahul Dravid not re applying for coaching post : वेस्ट इंडिज-अमेरिकेत आयोजित ट्वेन्टी२० वर्ल्डकप प्रशिक्षक म्हणून माझी शेवटची स्पर्धा असेल असं राहुल द्रविड यांनी स्पष्ट केलं आहे. द्रविड भारतीय प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करतील अशी अटकळ होती पण त्यांनी स्वत:च शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ते संध्या भारतीय संघासोबत शेवटचे विश्वचषकात सहभागी झाले आहेत. जिथे भारताला आपला पहिला सामना ५ जानेवारीला आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे.

राहुल द्रविड म्हणाले प्रत्येक स्पर्धा महत्त्वाची असते. मी ज्या ज्या सामन्यात भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिलं तो महत्त्वाचाच होता. ही प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी शेवटची स्पर्धा आहे. पण त्याने माझ्या दृष्टिकोनात बदल होणार नाही. मला हे काम आवडतं. भारताचा प्रशिक्षक म्हणून काम करताना मला प्रचंड आनंद आणि समाधान मिळालं. प्रशिक्षकपद हा मोठा बहुमान आहे. या संघाबरोबर काम करणं अतिशय आनंददायी होतं. सगळेच खेळाडू प्रतिभाशाली आहेत.

BCCI Denies Gautam Gambhirt Coaching Staff Recommendations
BCCIचा गौतम गंभीरला धक्का, प्रशिक्षक म्हणून निवडलेल्या कोचिंग स्टाफला बोर्डाने दिला नकार
Rahul Dravid in IPL
राहुल द्रविड IPL मध्ये पुनरागमन करणार? कोणता संघ आहे इच्छुक? वाचा
goverment school woman teacher mamta meena drunk and she treating badly with principal
“काँग्रेसचे लोक माझ्या खिशात” शिक्षिकेचा शाळेत दारू पिऊन धिंगाणा, मुख्याध्यापकाची पकडली कॉलर अन्…; पाहा धक्कादायक VIDEO VIRAL
kickboxing teacher rape marathi news
मुंबई: अत्याचाराप्रकरणी कीक बॉक्सिंग प्रशिक्षकाला अटक
Gautam Gambhir
मी टीम इंडियाच्या भावी प्रशिक्षकाशी बोलतोय का? विचारल्यावर गौतम गंभीर म्हणाला, ‘मी एवढा….
Akash Chopra Gives Stern Warning to Gautam Gambhir
रोहित-विराटचा संदर्भ देत भारताचा कोच होणाऱ्या गंभीरला माजी खेळाडूने दिला इशारा, म्हणाले; “संघातले बरेचसे खेळाडू…”
Gautam Gambhir Team India Head coach Interview Today
गौतम गंभीर भारताच्या प्रशिक्षकपदासाठी एकमेव अर्जदार; आज होणार मुलाखत
Gautam Gambhir is sure to take over as the head coach of Team India after the T20 World Cup 2024
Team India : गौतम गंभीरचं नाव कोचपदासाठी शर्यतीत, राहुल द्रविडच्या जागी सांभाळणार टीम इंडियाची धुरा?

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं वेळापत्रक अतिशय व्यग्र आहे. कौटुंबिक आघाडीवर माझ्यावर जबाबदारी आहे. ते पाहता हे दोन्ही एकाचवेळी सांभाळणं कठीण आहे. त्यामुळे मी प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करणार नाही. यात काहीही अनोखं नाही. मी जेव्हापासून ही जबाबदारी स्वीकारली, तेव्हापासून प्रत्येक सामना तितकाच महत्त्वाचा आहे.

हेही वाचा – Sri Lanka vs South Africa : दक्षिण आफ्रिकेची श्रीलंकेवर सरशी; नॉर्किए, रबाडाचा प्रभावी मारा

भारतीय संघ सातत्याने चांगला खेळत आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या ट्वेन्टी२० सामन्यात संघाने सेमी फायनलपर्यंत वाटचाल केली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येही आम्ही अंतिम फेरी गाठली. भारतात झालेल्या २०२३ वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने दिमाखदार कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. आम्ही चांगलं खेळत या वर्ल्डकपमध्ये जेतेपद पटकावू. वातावरण आणि खेळपट्टी यांचा अंदाज घेणं आवश्यक आहे. भारतीय संघाचे जगभर प्रचंड चाहते आहेत.