Afganistan vs Bangladesh Rashid Khan: अफगाणिस्तान संघाने बांगलादेशवर ८ धावांनी विजय मिळवत टी-२० विश्वचषकामध्ये इतिहास रचला आहे. यंदाच्या वर्ल्डकपम सेमी फायनलमध्ये धडक मारत ऑस्ट्रेलियाला त्यांनी स्पर्धेबाहेर केले आहे. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला आहे. रशीद आणि नवीन उल हक यांनी प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. पण अफगाणिस्तानचा संघ फलंदाजीत चांगलाच मागे पडला पण रशीदच्या अखेरच्या षटकातील धावा संघासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.

अखेरच्या षटकात संघासाठी धावा करताना रशीद धावा मिळवण्याचा प्रचंड आटापिटा करत होता. यादरम्यान मैदानात धाव नाकारल्याने रशीदने समोरच्या फलंदाजावर बॅट फेकली, ज्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. बांगलादेशविरुद्ध अफगाणिस्तानचे २० वे षटक सुरू होते. संघ ५ विकेट्सवर १०७ धावांवर झुंजत होता. रशीद खान क्रीजवर उपस्थित होता, त्याला समजले की या धावा बांगलादेशसाठी कमी असू शकतात आणि प्रत्येक चेंडूवर शक्य होतील तितक्या धावा घेण्याचा प्रयत्न करत होता पण करीमने अर्धी क्रिज धावत आलेल्या रशीदला धाव नाकारली आणि तो चांगलाच भडकला.

Gulbadin Naib Faking Injury to Waste Time
AFG v BAN: ‘हळू खेळा, पाऊस येतोय’, अफगाणिस्तानच्या कोचचा इशारा आणि गुलबदीन पाय पकडून खाली पडला… पाहा VIDEO
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Rohit Sharma abused Rishabh Pant and badly scolds for Dropped Easy Catch of Mitchell Marsh Video Viral
ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Rashid Khan Statement on Brian Lara
AFG v BAN: “…आम्ही करून दाखवलं” रशीद खानने विजयानंतर वक्तव्यात ब्रायन लाराचा उल्लेख का केला? काय आहे नेमकं कनेक्शन
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Jasprit Bumrah Viral Funny Video Post IND vs ENG
“बुमराह तू ये, माझा हात..”, IND vs ENG मॅच जिंकताच अंपायरच्या भेटीला गेला जसप्रीत पण.. Video पाहून चाहते लोटपोट

हेही वाचा – AFG v BAN: ‘हळू खेळा, पाऊस येतोय’, अफगाणिस्तानच्या कोचचा इशारा आणि गुलबदीन पाय पकडून खाली पडला… पाहा VIDEO

शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेल्या तंजीम हसन साकिबच्या पहिल्या चेंडूवर करीम जनातने रशीद खानला स्ट्राईक दिली. आक्रमक फलंदाजी शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या रशीदने दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. तिसऱ्या चेंडूवर त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू मिस हिट झाला आणि मिड-विकेटच्या सीमारेषेकडे जाण्याऐवजी कव्हर्समध्ये गेला. दरम्यान, रशीदने एक धाव घेतली आणि तो दुसरी धाव घेण्यासाठी धावला, परंतु जनातने त्याला माघारी पाठवले. यामुळे संतप्त झालेल्या रशीद खानने मागे धावताना आपली बॅट जमिनीवर फेकली. तो करीमवर नाराजी व्यक्त करताना दिसला आणि पुन्हा माघारी परतला.

हेही वाचा – Afghanistan vs Bangladesh: अफगाणिस्तानने घडवला इतिहास; बांगलादेशला हरवत सेमी फायनलमध्ये धडक, ऑस्ट्रेलिया माघारी

हेही वाचा –IND v AUS: “आम्ही ऑस्ट्रेलियाला ओळखून आहोत…” भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, म्हणाला “आम्हाला जे करायचं होतं”

रशीद खानच्या या कृतीने सगळेच थक्क झाले. जनातने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला आणि रशीदशी चर्चा करताना दिसला. परंतु कर्णधार जनातने एक धाव नाकारल्यने चांगलाच संतप्त दिसला आणि रागातच परत गेला. दोघांमधील हा संघर्ष सुरू असतानाही करीम जनात सहा चेंडूत सात धावा करण्यात यशस्वी ठरला. डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत रशीद खानने निर्धारित २० षटकांत अफगाणिस्तानची धावसंख्या ११५ धावांपर्यंत नेली. राशिद १० चेंडूत १९ धावा करून नाबाद परतला. अशारितीने शेवटच्या चेंडूवरील रशीदचा षटकार संघासाठी खूपच महत्त्वाचा ठरला आणि भेदक गोलंदाजीसह ११५ धावांचा बचाव करताना अफगाणिस्तावने ऐतिहासिक विजय मिळवला.