ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात साखळी फेरीच्या अखेरच्या दिवशी पहिला सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स असा झाला. या विजयासह उपांत्य फेरीत पोहोचण्याचे दक्षिण आफ्रिकेचे लक्ष होते. मात्र, नेदरलँड्सने अविश्वसनीय खेळ दाखवत विजेतेपदाचे दावेदार असलेल्या दक्षिण आफ्रिकेला १३ धावांनी पराभूत करत अपसेट घडवला. सुपर-१२ मध्ये आफ्रिकेने चार सामन्यांत त्याचे पाच गुण होते. हा सामना जिंकला असता तर तो अंतिम-४ मध्ये पोहोचला असता, पण नशिबाने त्यांना पुन्हा साथ दिली नाही. अपसेटचा सहावा संघ ठरला.

याच सामन्यात दक्षिण आफ्रीकेचाच एक माजी खेळाडू पराभवच कारण ठरला ज्यामुळे संघ थेट टी२० विश्वचषकातून बाहेर पडला. आफ्रिकेच्या डावाच्या १६व्या षटकात डेव्हिड मिलर बाद झाला आणि इथून सामना रंजक झाला. नेदरलँड्सच्या व्हॅन डर मर्वेने उत्कृष्ट झेल घेत मिलरला तंबूत पाठवले. मर्वेच्या या झेलने १९८३च्या विश्वचषकातील माजी भारतीय अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्या झेलची आठवण करून दिली. कपिल देव यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध धाव घेत शानदार झेल घेतला होता. त्याच पद्धतीने मर्वेनेही मागे धावत उत्तम झेल टिपला आणि मिलरला बाद केले.

Shanshak Singh Performance in IPL 2024
IPL 2024 मध्ये ‘या’ खेळाडूने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना फोडलाय घाम, ५ डावात फक्त एकदाच झालाय आऊट
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
md siraj
बंगळुरूच्या गोलंदाजांकडून कामगिरीत सुधारणेची अपेक्षा! ‘आयपीएल’मध्ये आज पंजाब किंग्जचे आव्हान
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: चार दिवसांपूर्वी स्ट्रेचरवर, आज चेन्नईचा हिरो; मुस्ताफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर आरसीबीने टेकले गुडघे

१५९ धावा या आफ्रिकेसाठी काही अवघड नव्हत्या. त्यात डेव्हिड मिलर सारख्या फलंदाजाचे पुनरागमन झाल्याने आफ्रिका उपांत्य फेरीत जाईल असेच वाटत होते. पण, मिलरची विकेटच सामन्यातील मुख्य कारण ठरली आणि त्याला जबाबदार दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू ठरला. एकेकाळी आफ्रिकेकडून खेळणाऱ्या आणि आता नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोएलॉफ व्हॅन डेर मर्वे याने अविश्वसनीय झेल घेत सामन्याला कलाटणी दिली.

सध्याचा नेदरलँड्सचा खेळाडू व्हॅन डेर मर्वेने २००४च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले होते. २००९मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० संघात पदार्पण केले आणि त्या सामन्यात त्याने ४८ धावा व १ बळी घेतला आहे. आफ्रिकेकडून त्याने एकदिवसीय व टी२० अशा मिळून २६ लढती खेळल्या. २०१५मध्ये त्याने नेदरलँड्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला.