सहज, खणखणीत आणि देखणी फटकेबाजी कशी करावी याचा वस्तुपाठ रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० वर्ल्डकपच्या सुपर८ गटाच्या लढतीत सादर केला. ४१ चेंडूत ९२ धावांच्या तडाखेबंद खेळीसह रोहितने १९ नोव्हेंबरला जे काम अपुरं राहिलं होतं ते पूर्ण केलं. वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये रोहितने अशीच सनसनाटी सुरुवात केली होती. मात्र ट्रॅव्हिस हेडच्या झेलमुळे रोहितची खेळी संपुष्टात आणली. सोमवारी सेंट ल्युसियात २०६ धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेडने ४३ चेंडूत ७६ धावांची सुरेख खेळी साकारली. एका बाजूने सहकारी परतत असतानाही हेड चौकार-षटकार मारत राहिला. पण जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने शांतपणे झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. हेड तंबूत परतताच ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या आशा मावळल्या.

19 नोव्हेंबर- अहमदाबाद- वनडे वर्ल्डकप फायनल
सलग १० सामने जिंकून भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली होती. भारतीय संघाचा प्रवास स्वप्नवत असा होता. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पहिलं षटक सावधपणे खेळून काढलं. दुसऱ्या षटकात हेझलवूडच्या गोलंदाजीवर डाऊन द ट्रॅक येत चौकार खेचला. पुढच्याच चेंडूवर रोहितने मारायच्या पट्यात आलेला चेंडू डीप मिडविकेट क्षेत्रात भिरकावून दिला. हेझलवूडच्या पुढच्या षटकात रोहितने शांत सुरुवात केली. मात्र पाचव्या चेंडूवर आवडता पूलचा फटका मारुन षटकार लगावला. याचीच री ओढत सहावा चेंडू हेझलवूडच्या डोक्यावरून मारत चौकार वसूल केला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma blasted 92 from 41 balls picked catch of travis head poetic justic to ahemdabad odi world cup final psp