USA bowler accuses Haris Rauf about ball tampering : पाकिस्तान क्रिकेट संघाला २०२४ च्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात अमेरिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. अमेरिकेविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघाची खूप खिल्ली उडवली जात आहे. आता या सामन्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या सामन्यात पाकिस्तान संघाच्या एका वेगवान गोलंदाजावर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या खेळाडूने या गोलंदाजावर हा आरोप केला आहे.

हारिस रौफवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप –

पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील सामन्यानंतर अमेरिकेचा दिग्गज क्रिकेटर रस्टी थेरॉनने वेगवान गोलंदाज हारिस रौफवर चेंडूशी छेडछाड (बॉल टॅम्परिंग) केल्याचा आरोप केला आहे. रस्टी थेरॉनने याबाबत एक्सवर एक पोस्टही केली आहे. ज्यामध्ये त्याने लिहले की, हरिस रौफने आपल्या नखाने चेंडू स्क्रॅच केला होता. कारण दोन षटकांपूर्वी बदललेला नवीन चेंडू रिवर्स करणे सोपे नाही. पुढे, त्याने आयसीसीला टॅग केले आणि लिहिले, आपण फक्त दिखावा करणार आहात का? यानंतरही अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला.

Kamran Akmal and Harbhajan Singh Video viral
WCL 2024 : शीख धर्माबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कामरान अकमल-हरभजन सिंग आमनेसामने, VIDEO व्हायरल
Rashid Khan Emotional Post SA vs AFG
५६ धावांसह अफगाणिस्तान विश्वचषकातून बाहेर! भावूक होत कर्णधार रशीद खान म्हणाला, “चांगली कामगिरी करता आली असती..”
Ian Smith Hilarious Reaction on Gulbadin Naib Fake Injury
“मी गुडघेदुखीसाठी गुलबदीनच्या डॉक्टरकडे जाईन…” इयान स्मिथचं अफगाणिस्तान खेळाडूच्या ‘खोट्या’ दुखापतीवर भन्नाट वक्तव्य
Gulbadin Naib fake injury
AFG v BAN: दुखापतीचा बनाव अफगाणिस्तानच्या गुलबदीनच्या अंगलट येणार? आयसीसीचे नियम काय सांगतात?
Afghanistan vs Bangladesh
अफगाणिस्तानची निराशाजनक फलंदाजी, दणदणीत पराभव होऊनही ऑस्ट्रेलियाच्या आशा पल्लवित
BCCI shares Vivian Richards in India dressing room video
IND vs BAN : “पॉकेट रॉकेट”, सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी ‘या’ भारतीय खेळाडूला दिले नवीन नाव, पाहा VIDEO
Glenn Maxwell catch by Noor Ahmed in the Gulbadin Naib over
AFG vs AUS : ग्लेन मॅक्सवेलचा झेल ठरला अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयाचा ‘टर्निंग पॉइंट’, VIDEO होतोय व्हायरल
Babar Azam Accused for Fixing in PAK vs USA Match Watch Video
T20 WC 2024: अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात बाबर आझमने केलं फिक्सिंग? पाकिस्तानमधल्या ज्येष्ठ पत्रकाराचा आरोप; VIDEO व्हायरल

पाकिस्तानसाठी मोहम्मद आमिर ठरला खलनायक –

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अमेरिकेला १६० धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, प्रत्युत्तरात अमेरिकेचा संघ १५९ धावाच करु शकला. त्यामुळे हा सामना बरोबरीत सुटला अर्थात टाय झाला. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये १९ धावांचे लक्ष्य दिले. ज्यानंतर पाकिस्तानला १३ धावाच करता आल्या. अशा प्रकारे अमेरिकेने पाकिस्तानचा सुपर ओव्हर्समध्ये ५ धावांनी पराभव केला. सौरभ नेत्रावळकरने सुपर ओव्हरमध्ये विकेट काढल्याने अमेरिकेचा विजय सोपा झाला. या सगळ्यानंतर पाकिस्तान संघाचे चाहते पराभवाचे खापर सुपर ओव्हर टाकणाऱ्या मोहम्मद आमिरवर फोडत आहेत. कारण त्याने या सुपर ओव्हरमध्ये ३ वाइडसह १८ धावा खर्च केल्या.

हेही वाचा – IND vs PAK : विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

पुढच्या सामन्यात पाकिस्तानसमोर भारताचे आव्हान –

पाकिस्तान संघाला आता पुढील सामना भारतीय संघाविरुद्ध खेळायचा आहे, जो न्यूयॉर्कच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर आता सुपर ८ चा मार्ग पाकिस्तानसाठी खूपच कठीण झाला आहे, ज्यामध्ये त्यांना त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक असेल. २०२१ साली खेळल्या गेलेल्या विश्वचषकात झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. अशा प्रकारे टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत पाकिस्तानला भारताला फक्त एकदाच पराभूत करण्यात यश आले आहे. त्यामुळे पुढचा सामना पाकिस्तानसाठी आणखीनच अवघड असणार आहे.