Shoaib Akhtar Slams Mohammad Shami: T20 विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान पराभूत होताच पाकिस्तानी माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी एक हार्टब्रेक ईमोजी ट्वीट केली होती. यावर प्रतिक्रिया देताना भारताचा गोलंदाज मोहम्मद शमीने अख्तर यांना ‘याला कर्म म्हणतात’ असे म्हणत डिवचले होते. आता शमीच्या ट्विटरवर शोएब अख्तर यांनीही उत्तर देत हर्षा भोगले यांच्याच एका ट्वीटचा संदर्भ देत शमीला सुनावले आहे. नेमकं हे ट्वीट वॉर कशामुळे सुरु झालं आणि अख्तर आता शमीला काय म्हणाले आहेत हे आपण पाहुयात..

टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा इंग्लंड कडून पराभव झाल्यांनतर शोएब अख्तर यांनी संघावर टीका केली होती, यावेळी त्यांनी मोहम्मद शमीला खेळवण्याचा निर्णयावर सुद्धा भाष्य केले होते. अख्तर म्हणाले होते की “ टीम इंडियाने अचानक शमीला संघात सामील केले, तो एक चांगला वेगवान गोलंदाज आहे, परंतु संघात येण्यास पात्र नाही, शमीच्या ऐवजी चहल खेळू शकला असता असेही अख्तर म्हणाले होते. याच वाक्यावरून भडकलेल्या शमीने पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब अख्तर यांना कोपरखळी मारली. शमीने शोएब अख्तर यांच्या ट्वीटवर पाकिस्तानचा पराभव ही कर्माची फळं आहेत असं म्हंटल्यावर मग अख्तरही शांत बसले नाहीत त्यांनीही शमीवर पलटवार केला.

Rohit Sharma Unwanted Record In IPL 2024
MI vs CSK : रोहित शर्माच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, ‘या’ बाबतीत ठरला तिसरा खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: १२ वर्षांनी शतक तरीही सेलिब्रेशन नाही, रोहित शर्माचा सामन्यानंतरचा व्हीडिओ चाहत्यांना करतोय भावुक
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: “अरे २ ओव्हरमध्ये २४ धावा सहज होतील…” शशांक आणि आशुतोषने सांगितला किस्सा, शेवटच्या ओव्हरमध्ये काय झालं बोलणं, पाहा व्हीडिओ

मोहम्मद शमीच्या ‘कर्म’ ट्वीटला उत्तर देताना शोएब अख्तर यांनी हर्ष भोगलेचे ट्वीट शेअर केले आहे. भोगले यांनी पाकिस्तानच्या संघाच्या गोलंदाजीचे कौतुक करत “असे खूप कमी संघ आहेत ज्यांना १३७ सारखा कमी स्कोअर डिफेन्ड करता आला असता” असे ट्वीट केले होते. शोएब अख्तर यांनी यावरून शमीला सुनावत याला म्हणतात सेन्सिबल ट्वीट असे प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांनी खरोखरच कमाल करून दाखवली. इंग्लंडला प्रत्येक धाव पूर्ण करण्यासाठी अटीतटीची लढत द्यावी लागली होती, शोएब अख्तर यांनीही पाकिस्तानी गोलंदाजांचे कौतुक करत तुमचं नशीब नव्हतं पण तुम्ही उत्तम खेळलात असे म्हंटले होते.

शोएब अख्तर यांनी मोहम्मद शमीला सुनावले

T20 World Cup Final: शाहीन आफ्रिदीने घेतलेली ‘ती’ कॅच पाकिस्तानला पडली भारी; इंग्लंडच विश्वविजेता!

भारत आणि पाकिस्तान यांनी टी-20 विश्वचषकाच्या गट 2 मध्ये अव्वल स्थान पटकावल्यानंतर उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पाकिस्तानने उपांत्य फेरीत केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचा पराभव केला, तर बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने रोहित शर्माच्या टीम इंडियाला हरवून विश्वचषकाच्या शिअंतिम सामन्यात धडक दिली. सॅम कुरनच्या गोलंदाजीने व बेन स्टोक्सच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने रविवारी एमसीजी येथे झालेल्या टी-20 विश्वचषक फायनलमध्ये पाकिस्तानवर ५ गडी राखून विजय मिळवला.