Shoaib Akhtar vs Mohammad Shami: टी २० विश्वचषकात भारत उपांत्य फेरीतून बाहेर पडल्याने अंतिम सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान लढत बघण्याचं अनेकांचं स्वप्न अर्धवट राहिलं पण आता त्याची कसर ट्विटर भरून निघत आहे. टी २० विश्वचषकाच्या अंतिम महासामन्यात जोस बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघाने बाबर आझम अँड कंपनीचा अगदी अटीतटीच्या सामन्यात ५ गडी राखून पराभव केला, यानंतर दुःखी व नाराज पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू, चाहते विरुद्ध भारतीय फॅन्स यांच्यात ट्वीट वॉर सुरु झाले आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर जेव्हा शोएब अख्तरने जेव्हा हार्ट ब्रेक ईमोजी पोस्ट केला होता त्यावरून भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने चिमटा घेत हे तुमच्या कर्माचं फळ आहे असं म्हणत ट्वीट केलं होतं. आता मोहम्मद शमीच्या या ट्विटवरून अन्य पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूंनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

शमीच्या ट्वीटला उत्तर देताना स्वतः शोएब अख्तर याने गोलंदाजीचे कौतुक सांगत याला सेन्सिबल ट्विट म्हणतात असा पलटवार केला होता, यावेळी अख्तरने हर्षा भोगले यांच्या एका ट्विटचा संदर्भ दिला होता. तर यापाठोपाठ शाहीद आफ्रिदीने सुद्धा शमीला सुनावणारे ट्वीट केले होते.

After Virat Kohli Fight why Gautam Gambhir fiercely argue With Umpire
विराट कोहलीचा वाद संपेपर्यंत गौतम गंभीर भडकला; श्रेयसने इशारा करताच पंचांशी भिडला, पण झालं काय? पाहा Video
miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

आता याच वादात पाकिस्तानचे माजी खेळाडू वसीम अक्रम यांनीही उडी घेतली आहे. शोएब अख्तर व पाकिस्तानी संघाची पाठराखण करत वसीम अक्रम म्हणाले की, “प्रत्येकजण देशभक्त आहे, प्रत्येकाचे स्वतःच्या देशावर प्रेम आहे, भारतीयांचं भारतावर प्रेम आहे, असुदे पण म्हणून जळत्यावर तेल टाकून, ट्वीट वर ट्वीट करण्याला काहीच अर्थ नाही, हे असे प्रकार बंद करा”

T20 World Cup Final: शाहीन आफ्रिदीने घेतलेली ‘ती’ कॅच पाकिस्तानला पडली भारी; इंग्लंडच विश्वविजेता!

पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह उल हक यानेही यावर भाष्य करताना “तुम्ही केवळ काही ‘लाइक्स’साठी असे करू नये. भारताचे असो किंवा पाकिस्तानचे किंवा इतर कोणत्याही देशाचे, आपण सर्व क्रिकेटपटू एक कुटुंब आहोत. त्यामुळे आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे आणि आपली मते आदरपूर्वक मांडली पाहिजेत. आमचीही काही जबाबदारी आहे.”असे म्हंटले होते.

मोहम्मद शमीने शोएब अख्तर यांच्यावर टीका का केली?

टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा इंग्लंड कडून पराभव झाल्यांनतर शोएब अख्तर यांनी संघावर टीका केली होती, यावेळी त्यांनी मोहम्मद शमीला खेळवण्याचा निर्णयावर सुद्धा भाष्य केले होते. अख्तर म्हणाले होते की “ टीम इंडियाने अचानक शमीला संघात सामील केले, तो एक चांगला वेगवान गोलंदाज आहे, परंतु संघात येण्यास पात्र नाही, शमीच्या ऐवजी चहल खेळू शकला असता असेही अख्तर म्हणाले होते.