Rishabh Pant Shares Hilarious Video of Dhoni, Kohli, and Rohit Dancing : टी-२० वर्ल्ड कप २०२४ मध्ये टीम इंडिया चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. सुपर ८ फेरीमधील शेवटच्या सामन्यात भारताने बांगलादेशचा ५० धावांनी पराभव करीत उपांत्य फेरीत आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. त्यात ऋषभ पंतची तुफानी खेळी पाहायला मिळाली. वर्ल्ड कप २०२४ मधील चमकदार कामगिरीमुळे ऋषभ पंतचा चेहरा आता सातत्याने चर्चेत असतो. मात्र, सध्या तो एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

पंतने बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनी, विराट कोहली व सध्याचा कर्णधार रोहित शर्मा एका घराच्या गच्छीवर नाचताना दिसत आहेत. या तिघांचा हा डान्स पाहून चाहत्यांना हसू आवरणे अवघड झाले आहे. व्हिडीओमध्ये भारताचे तीन दिग्गज खेळाडू बॉलीवूडच्या ‘गुरू’ या सिनेमातील प्रसिद्ध ‘बरसो रे मेघा मेघा’ या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. हा मजेशीर व्हिडीओ शेअर करीत ऋषभने तिन्ही दिग्गज खेळाडूंची माफीदेखील मागितली आहे.

WI vs SA सामन्यादरम्यान भीषण अपघात; कॅच घेण्याच्या नादात रबाडा व यानसेनमध्ये जोरदार टक्कर, एक जखमी अन् दुसरा…; पाहा video

ऋषभ पंतने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे शेअर केलेला हा व्हिडीओ एआय जनरेटेड आहे. त्यामध्ये प्रथम धोनी आणि कोहली बरसो रे मेघा बरसोमध्ये नाचताना दिसत आहेत. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माची एक मजेदार डान्सिंग एन्ट्री आहे; जी पाहून कोणालाही हसू येईल.

हा व्हिडीओ शेअर करताना ऋषभ पंतने लिहिले, “एक चांगल विजय. माझ्या सर्व भावांनो, माफ करा; पण मला हा अप्रतिम व्हिडीओ पोस्ट करावा लागला. ज्यांनी हे माझे पहिले स्क्रीन रेकॉर्डिंग बनवले त्यांचे आभार.”

Afg Vs Aus: अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयानंतरही कर्णधार राशिद खान नाराज; म्हणाला, “आनंद, अभिमान पण कामगिरी….”

भारतीय संघ सुपर-८ फेरीतील शेवटचा सामना २४ जून रोजी सेंट लुसिया येथील डॅरेन सेमी क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. गट क्र. १ च्या गुणतालिकेत भारत दोन सामन्यांतील दोन विजयांमुळे चार गुणांसह पहिल्या स्थानावर आहे; तर ऑस्ट्रेलिया दोन सामन्यांतील एका विजयामुळे दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे हा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचे आहे.