Suryakumar Yadav IND v AFG: टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर८ सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा ४७ धावांनी पराभव करत विजयाने खाते उघडले. या सामन्यात सूर्यकुमार यादवने अप्रतिम फटकेबाजी केली. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने मोहम्मद सिराजचे नाव घेत सूर्यकुमार यादवला. त्यानंतर सूर्यकुमारने असे उत्तर दिले की, तिथे उपस्थित असलेले सर्वजण जोरजोरात हसायला लागले. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा – VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!

अफगाणिस्तानविरुद्ध शानदार फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने आपल्या टी-२० कारकिर्दीतील १९वे अर्धशतक झळकावले. टीम इंडियासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने एकूण २८ चेंडूंमध्ये १८९.२९ च्या स्ट्राइक रेटने ५३ धावा करण्यात यशस्वी झाला. दरम्यान, त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि ३ उत्कृष्ट षटकार आले.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेदरम्यान सूर्यकुमार यादवला पत्रकाराने प्रश्न विचारताना चुकून सिराज म्हटले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने उत्तर दिले की, सिराज तर नाहीय रे इथे… सिराज भाई आता जेवतोय. सूर्यकुमारचे हे उत्तर ऐकून तेथे उपस्थित सर्वजण हसू लागले. ज्याचा व्हीडिओ आयसीसीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर या व्हीडिओच्या कॅप्शनमध्येही सूर्या दादा गलती से मिस्टेक हो जाती है असं म्हटलंय. या व्हीडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला असून चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – IND v AFG: भारताच्या विजयानंतर जडेजाने ड्रेसिंग रूममध्ये राहुल द्रविडला थेट उचलून घेतलं, पण नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO

हेही वाचा – IND v AFG: भारताच्या विजयानंतर प्लेईंग इलेव्हनवर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, म्हणाला; भविष्यातील सामन्यांमध्ये तीन गोलंदाज….

अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर ८ सामन्यात मोहम्मद सिराजच्या जागी उत्कृष्ट फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा संघात समावेश करण्यात आला. ज्याने अप्रतिम गोलंदाजी करत २ विकेट घेतले. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १८१ धावा केल्या. भारताकडून फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने या सामन्यात सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सूर्यकुमारची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ केवळ १३४ धावा करू शकला. या विजयासह टीम इंडियाने उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे.