Suryakumar Yadav Catch Video With New Angle: सूर्यकुमार यादवने टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विजयावर जवळजवळ शिक्कामोर्तब करणारा झेल घेतल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्हायरल झाले आहेत. सूर्याने घेतलेला हा झेल इतका आगळा वेगळा होता की अनेकांना यावर विश्वासही बसत नाहीये. अर्थात अनेकजण कौतुकाने या कॅचला अविश्वसनीय म्हणत असले तरी काहींना मात्र यात चीटिंगचा अँगल दिसून येतोय. स्वतः दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी सूर्याने घेतलेला कॅच हा नियमाला धरूनच होता असे मान्य केले. पण भारतातच काही स्वयंघोषित क्रिकेटतज्ज्ञ, “सूर्याने मुद्दामच सीमारेष पुढे ढकलली”, “उडी घेताना सीमारेषेला स्पर्श केला होता”, असे कयास बांधत आहेत. या सगळ्या अंदाजांना खोटं सिद्ध करणारा एक नवा व्हिडीओ सध्या समोर आला आहे जो पाहून सूर्याने घेतलेली कॅच कशी व किती परफेक्ट होती हे सिद्ध होतंय.

२५ चेंडूत २५ धावांचे आव्हान असताना, दक्षिण आफ्रिकेचा विजय ९० टक्के निश्चित झाला होता. पुढे जसप्रीत बुमराहने मोजक्याच धावा देत टाकलेलं षटक, हार्दिक पंड्याने मोक्याच्या क्षणी घेतलेली क्लासेनची विकेट यामुळे कुठेतरी भारताच्या विजयाच्या आशा सुद्धा पल्लवित झाल्या होत्या. पण तरीही समोर डेव्हिड मिलरच्या रूपात तगडं आव्हान टीम इंडियासमोर होतं. शेवटच्या षटकाच्या वेळी स्ट्राईकवर उभ्या ठाकलेल्या मिलरला एका षटकाराची गरज होतीच ज्यामुळे भारतावर प्रचंड दबाव निर्माण झाला असता आणि दक्षिण आफ्रिकेसमोरचं आव्हानही सोपं झालं असतं. यानुसार मिलरने एक मोठा फटका मारला, अगदी सामान्य परिस्थितीत हा फटका षटकार किंवा चौकारच ठरला असता पण भारताचा असामान्य सूर्या तिथे उभा होता. सूर्याने इतक्या दबावात सुद्धा चपळाई दाखवून झेल टिपला. या कॅचचे वेगवेगळ्या अँगलने काढलेले व्हिडीओ सध्या ऑनलाईन व्हायरल होत आहेत.

a boy can not swim but jumped into the well as a friend said
पोहता येत नव्हते पण मित्र म्हणाला म्हणून विहिरीत उडी मारली; चिमुकल्याचा मैत्रीवरचा विश्वास, VIDEO होतोय व्हायरल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
India participation in the Russia Ukraine conflict peace process is important
…तरीसुद्धा युक्रेन-शांतता प्रयत्नांत भारत हवाच!
Loksatta kutuhal System Reliability Self Driving Artificial Intelligence
कुतूहल: प्रणालींची विश्वासार्हता
Russian President Vladimir Putin, nuclear weapons policy,
विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?
father and mother cried at the moment of kanyadaan at daughters wedding ceremony
मायबापासाठी सर्वात कठीण क्षण! लेकीच्या कन्यादानावेळी आईवडीलांना अश्रु अनावर, Video पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी
Leopard and dog Fight Dogs Fight With Leopard See Who Will Win In The War Animal shocking Video
“जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं” कुत्र्यांनी अवघ्या १० सेकंदात बिबट्याला फाडून टाकलं; VIDEO पाहून झोप उडेल
security personnel slap scooter driver
VIDEO : दुचाकी विरुद्ध दिशेने चालवल्याने जवानाचा लाठीहल्ला; कारच्या डॅशकॅममध्ये घटना कैद

अनेकांनी या कॅचची तुलना १९८३ मध्ये कपिल देव यांनी घेतलेल्या कॅचशी सुद्धा केली होती. त्या विकेटमुळे भारत पहिला वर्ल्डकप जिंकला होता आणि आता पुन्हा एकदा मोठ्या दुष्काळानंतर भारताला विजयी होण्यासाठी ही सूर्याची कॅच कामी आली. दरम्यान, X वर एका चाहत्याने कॅचचा स्लो-मोशन व्हिडीओ शेअर केल्याने वादाला तोंड फुटले होते. सूर्यकुमारचे शूज सीमारेषेवरून उडी मारून जाताना म्हणजे हवेत बॉल उडवण्याच्या आधी सीमारेषेवरील ब्लॉकला लागले होते असे त्यात दिसतेय असा दावा या व्हिडीओमध्ये करण्यात होता. यावर एका अन्य चाहत्याने वेगळ्या अँगलने व्हिडीओ पोस्ट करून मैदानातील संपूर्ण कृती दाखवली आहे.

या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येतेय की कॅच दरम्यान सूर्यकुमारच्या शूजचा कोणताही भाग सीमारेषेच्या संपर्कात आलेला नाही. त्यामुळे थर्ड अंपायरने दिलेला निर्णय योग्य आहे.

हे ही वाचा<< रोहित, कोहली, बुमराह, द्रविडने १६ तासांच्या प्रवासात केलं काय? एकत्र प्रवास केलेल्या प्रतिनिधींनी शेअर केलेला खास अनुभव वाचा

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सूर्यकुमारने बार्बाडोसमधील विजेतेपद पटकावून देणाऱ्या कॅच घेतानाच्या मनस्थितीविषयी भाष्य केलं आहे. सूर्या म्हणाला की, “रोहित भाऊ सहसा लाँग-ऑनला कधीच नसतो पण त्या क्षणी तो तिथे होते. जेव्हा चेंडू येत होता तेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याने माझ्याकडे पाहिलं. मी धावत गेलो, मला माहित होतं की काही केल्या मला ही विकेट घ्यायची आहेच. तो [रोहित] जवळ आला असता, तर मी त्याच्याकडे चेंडू टाकला असता पण त्या चार ते पाच सेकंदात जे काही घडले ते शब्दांमध्ये सांगताच येणार नाही.”