सिडनी येथे गुरुवारी (२७ ऑक्टोबर) झालेल्या टी२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध मोठा विजय नोंदवला. त्याने हा सामना १०४  धावांनी जिंकला. या सामन्यादरम्यान अशी घटना घडली, की पाहून सगळेच अवाक् झाले. वास्तविक, दक्षिण आफ्रिकेच्या डावात बांगलादेशचा यष्टीरक्षक नुरुल हसनने चाणाक्षपणा दाखविण्याचा प्रयत्न केला, पण ही गोष्ट संघाला फार महागात पडली.

बांगलादेश-दक्षिण आफ्रिका सामन्यात नेमकं असं काही घडले की, ते चाहत्यांना देखील कळले नाही. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध ११ वे षटक करत होता. त्याचा शेवटचा चेंडू नो बॉल होता. यावर अंपायरने फ्री हिट दिली. शकीब पुन्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हा यष्टिरक्षक नुरुल हसनने थोडी जागा बदलत हालचाल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू फेकताना तो स्टंपच्या मागे जागा बदलताना दिसला. लेग अंपायर रॉड टकर यांच्या ते लक्षात आले. त्यानंतर त्त्यांनी दुसरे पंच लँग्टन रुसेरे यांच्याशी बोलून बांगलादेश संघावर पाच धावांचा दंड ठोठावला.

IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: “निम्म्या खेळाडूंना तर इंग्लिशही समजत नाही…” RCB संघासह मॅनेजमेंटवरही भडकला वीरेंद्र सेहवाग
Shanshak Singh Performance in IPL 2024
IPL 2024 मध्ये ‘या’ खेळाडूने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना फोडलाय घाम, ५ डावात फक्त एकदाच झालाय आऊट
babar azam became again captain of pakistan cricket team
बाबर पुन्हा पाकिस्तानचा कर्णधार
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: चार दिवसांपूर्वी स्ट्रेचरवर, आज चेन्नईचा हिरो; मुस्ताफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर आरसीबीने टेकले गुडघे

आयसीसीच्या नियमांनुसार, गोलंदाज ज्यावेळी चेंडू टाकण्यासाठी रनअप घेतो तेव्हा यष्टीरक्षक चेंडू टाकला जाईस तोपर्यंत आपली स्थिती बदलू शकत नाही किंवा तो हालचाल करू शकत नाही. नुरुल हसनने ही चूक केली आणि त्याचा फटका बांगलादेशला सहन करावा लागला.

हेही वाचा :  FIH Pro League: न्यूझीलंडविरुद्धच्या एफआयएच प्रो लीग सामन्याने भारतीय हॉकी संघाची विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात 

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव १६.३ षटकांत १०१ धावांत गुंडाळला गेला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे नायक होते रिले रोसो, एनरिच नोर्टजे आणि तबरीझ शम्सी. रोसोने शानदार शतक झळकावले. त्याने १०९ धावा केल्या. त्याचवेळी नॉर्टजेने चार आणि शम्सीने तीन गडी बाद केले.