पाकिस्तान संघाला पराभूत केल्यानंतर झिम्बाब्वे संघाचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला होता. मात्र, हा आत्मविश्वास धुळीस मिळवण्याचे काम भारतीय संघाने रविवारी (दि. ०६ नोव्हेंबर) केले. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीतील शेवटचा म्हणजेच ४२ वा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात पार पडला. हा सामना भारताने ७१ धावांनी आपल्या नावावर केला. आता भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध दोन हात करेल.

याच सामन्यात सूर्यकुमार यादवची झंझावती खेळी प्रेक्षकांना अनुभवता आली. सामना संपल्यानंतर इरफान पठाण आणि जतीन सप्रू यांनी स्टार स्पोर्ट्ससाठी छोटीशी मुलाकात घेतली. त्यावर इरफान पठाणने त्याला ‘डान्सिंग सूर्या’ अशी पदवी दिली. इरफानने त्याला विचारले की, “तुझ्या बुटात काय स्प्रिंग बसवली आहे का?” यावर सुर्यकुमारने हसत उत्तर दिले की, “ मी नेहमी गोलंदाज काय विचार करत असतो यावर माझे फटके ठरवतो. मला माहिती जर मी खेळपट्टीवर सारखा मागेपुढे होत राहिलो, शफल करत राहिलो तर ते गोलंदाजाला चेंडू टाकायला थोडे अवघड जाते. मी ज्यावेळी फटके मारतो त्यावेळी मी वेगळ्या झोनमध्ये असतो. या अशा सर्व फटक्यांची मी सरावादरम्यान खूप प्रॅक्टिस केली आहे. त्यामुळे मला अशा फटक्यांची खूप सवय झाली आहे.”

Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’
Rohit Sharma takes over, sends Hardik Pandya to the boundary in iconic role-reversal as MI captain feels SRH's wrath
VIDEO : हैदराबादच्या ‘रन’ धुमाळीसमोर हार्दिकने पत्करली शरणागती, रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना पाठवले सीमारेषेवर

पुढे हरभजन सिंगने देखील त्याला प्रश्न विचारला की, “मुंबईचा राजा तू सर्व गोलंदाजांना तर चांगलेच चोपले. तुला हे फटके खेळताना दुखापत होण्याची भीती वाटत नाही का?” यावर सूर्या म्हणाला की, “फाटक्यांसाठी नेहमी तयार असतो. मुंबई इंडियन्स कडून खेळताना पहिले सरावादरम्यान थोडी दुखापत झाली होती. पण आता त्याची सवय झाली आहे. ऑस्ट्रेलिया येण्याआधी मला येथील मैदानांची कल्पना होती. येथील मैदाने खूप मोठी आहेत. त्यामुळे आम्ही सराव सामन्यादरम्यान याची सवय करून घेतली होती आणि आज त्याचा मला फायदा झाला.”

हेही वाचा :   IND vs ZIM: दिलदार रोहित! अचानक मैदानात शिरलेल्या चाहत्यासाठी केली ही विनंती, पाहा video

जतीन सप्रूने शेवटी एक प्रश्न विचारला की, “ कसे वाटते आहे टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचली आहे.” यावर सुर्यकुमार यादवने उत्तर दिले की, “रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वात खेळलो आहे. त्यामुळे आम्ही हा विश्वचषक नक्की जिंकणार असा आम्हला विश्वास वाटायला लागला आहे. पण एकावेळी एक सामना असा विचार सध्या आम्ही करत आहोत. नक्कीच इंग्लंड संघ ताकदवान आहे पण आम्हीपण संपूर्ण ताकदीने सामन्यात खेळू असा मला विश्वास वाटतो.”