टी-२०विश्वचषक २०२२ मध्ये, शुक्रवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात गट-१ मधील सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी यजमान ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला आहे. मॅथ्यू वेडचा कोविड-१९ चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसे असले तरी कोविड पॉझिटिव्ह क्रिकेटपटूही सामना खेळू शकतील, असे आयसीसीने टी-२० विश्वचषक सुरू होण्यापूर्वी जाहीर केले आहे.

अशा परिस्थितीत वेड या महत्त्वाच्या सामन्यात खेळताना दिसू शकतो. फक्त तब्येत चांगली राहावी लागेल. कारण ऑस्ट्रेलियन संघाकडे बॅकअप यष्टीरक्षक फलंदाज नाही. वास्तविक जोश इंग्लिस ऑस्ट्रेलियन संघाचा भाग होता, परंतु 2022 च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी गोल्फ खेळताना तो जखमी झाला होता. त्यामुळे बॅकअप म्हणून ऑस्ट्रेलियन संघाने कॅमेरुन ग्रीनला संधी दिली. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियन संघासाठी मॅथ्यू वेडची भूमिका महत्त्वाची ठरते.

Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO
Virat Reveals Time Spent With Family
IPL 2024 : ‘लोक आम्हाला ओळखत नव्हते’, विराट कोहली दोन महिने कुठे होता? स्वत:च उघड केले गुपित
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: चार दिवसांपूर्वी स्ट्रेचरवर, आज चेन्नईचा हिरो; मुस्ताफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर आरसीबीने टेकले गुडघे

हेही वाचा – IND vs NED T20 World Cup 2022 : सिडनीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांपेक्षा विराटच सरस, पाहा ‘ही’ आकडेवारी

वेडच्या आधी अॅडम झाम्पा देखील कोविड-१९ चाचणीत पॉझिटिव्ह आढळला होता. ग्रुप-१ मध्ये इंग्लंडला मागील सामन्यात आयर्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र त्यानंतर त्यांनी श्रीलंकेविरुद्ध सात विकेट्सने विजय नोंदवला. गुणतालिकेत सध्या इंग्लंड तिसऱ्या तर ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे. हा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे.