टी२० विश्वचषक २०२२ मध्ये, वेस्ट इंडिज आणि आयर्लंड यांच्यात आज होबार्टमधील बेलेरिव्ह ओव्हल मैदानावर सामना झाला. या सामन्यातील विजेता २०२२ च्या टी२० विश्वचषकातील सुपर-१२ मध्ये पोहोचणार असल्याने वेस्ट इंडीज च्या दृष्टीने हा सामना खूप महत्त्वाचा होता. मात्र वेस्ट इंडिज संघाला खूप मोठा धक्का बसला आहे. दोनवेळची चॅम्पियन वेस्ट इंडिज आयर्लंडकडून पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला.

टी२० विश्वचषकाच्या ११व्या सामन्यात आयर्लंडने वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून पराभव केला. या विजयासह आयर्लंडचा संघ टी२० विश्वचषकाच्या सुपर-१२ मध्ये पोहोचला आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिज संघाची मोठी निराशा झाली असून तो या विश्वचषकातून बाहेर पडला आहे. वेस्ट इंडिजने आयर्लंडसमोर विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. विंडीज संघाकडून ब्रेंडन किंगने सर्वाधिक ६२ धावांची खेळी खेळली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. आयर्लंडकडून गॅरेथ डेलनीने चार षटकांत १६ धावांत ४ फलंदाज बाद केले.

Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद

धावांचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या आर्यलंडने ४.२ षटकातच ५० धावा केल्या. त्यांचा कर्णधार-सलामीवीर अँड्रयू बालबर्नी आणि पॉल स्टर्लिंग यांनी पहिल्या गड्यासाठी ४५ चेंडूत ७३ धावांची भागीदारी रचली. बालबर्नीने २३ चेंडूत ३७ धावा केल्या. तसेच स्टर्लिंगने ३२ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने शेवटपर्यंत फलंदाजी करत ४८ चेंडूत ६६ धावा केल्या.

हेही वाचा :   T20 World Cup 2022: टी२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पहिल्यांदाच फेव्हरेट नाही, समालोचक हर्षा भोगले यांचे मोठे विधान

तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही तुम्हाला सांगतो की या सामन्यातील विजेता थेट सुपर-१२ फेरीसाठी पात्र ठरेल आणि पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर जाईल. येथील समीकरणे अगदी सोपी आहेत. याआधी काल श्रीलंका आणि नेदरलँड्स पात्र ठरले आहेत. आज कोणते दोन संघ पात्र ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वेस्ट इंडीज की आयर्लंड? झिम्बाब्वे की स्कॉटलंड? दिवसाचा दुसरा सामना झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे.

हेही वाचा :   T20 World Cup 2022 : वीरेंद्र सेहवागची मोठी भविष्यवाणी, म्हणाला टी२० विश्वचषकात ‘हा’ फलंदाज करणार सर्वाधिक धावा

२०२२ चा विश्वचषक हा काही संघांसाठी चांगला गेला तर काहींसाठी वाईट. पण दोनवेळची वेस्ट इंडीजसाठी ही खूप मोठी नामुष्की ठरली आहे.  ज्यांनी २ एकदिवसीय विश्वचषक, एक चॅम्पियन ट्रॉफी आणि दोन टी२० विश्वचषक असे त्यांच्या नावावर असताना हा पराभव खूप मोठा धक्का आहे. वेस्ट इंडीज प्रवास मात्र आज येथेच थांबला आहे.