Match Fixing in T20 World Cup 2024: टी-२० विश्वचषक २०२४ आता सुपर८ फेरीकडे वळला आहे. आता ८ संघांमध्ये पुढील फेरी गाठण्याची चुरस रंगणार आहे. सुपर८ मधील सामने उद्यापासून म्हणजेच १९ जूनपासून सुरूवात होणार आहे. पण तत्त्पूर्वी मॅच फिक्सिंगचे मोठे प्रकरण समोर आले. एका अहवालानुसार, गट फेरीतील सामन्यांदरम्यान मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करण्यात आले. एका युगांडाच्या संघातील एका खेळाडूला यासाठी फोन करण्यात आले पण त्याने आयसीसीकडे तक्रार केली.

हेही वाचा – Super 8 Explainer: वर्ल्डकपमधील सुपर८चे सामने कसे खेळवले जाणार? काय आहे A1, B2 चं गणित; जाणून घ्या सविस्तर

Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Jasprit Bumrah Viral Funny Video Post IND vs ENG
“बुमराह तू ये, माझा हात..”, IND vs ENG मॅच जिंकताच अंपायरच्या भेटीला गेला जसप्रीत पण.. Video पाहून चाहते लोटपोट
Rishabh Pant Medical Time Out Delayed The Game with Perfect Move
T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण
Kuldeep Yadav Marriage
कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
ind vs aus t 20 cricket world cup 2024 super 8 match
Ind vs Aus T20 WC: सेमीफायनलचं गणित आकड्यांमध्ये अडकलं; भारतही पडू शकतो बाहेर, वाचा काय आहे नेमकं सूत्र!
Jay Shah on Rohit Sharma captaincy
टी-२०तून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा; म्हणाले, “यापुढे तो…”

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, टी-२० विश्वचषक २०२४ च्या गट सामन्यांदरम्यान युगांडाच्या एका खेळाडूशी मॅच फिक्सिंगसाठी संपर्क साधण्यात आला होता. केनियाच्या एका खेळाडूने त्याला मॅच फिक्सिंगसाठी वेगवेगळ्या नंबरवरून कॉल केला. महत्त्वाची बाब म्हणजे युगांडाच्या खेळाडूने याबाबत आयसीसीकडे तक्रार केली. युगांडाच्या खेळाडूने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी प्रोटोकॉलचे पालन करत तेथे उपस्थित असलेल्या भ्रष्टाचारविरोधी युनिटला तात्काळ माहिती दिली. मात्र केनियाच्या या माजी खेळाडूची ओळख उघड केली नाही. मॅच फिक्सिंगशी संबंधित गुन्ह्यांबाबत आयसीसीने अनेक कठोर नियम केले आहेत. यासाठी भ्रष्टाचारविरोधी प्रोटोकॉलही बनवण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘क्रिकेटमध्ये सेक्स ही अत्यंत सामान्य गोष्ट…’, अभिषेक नायरचे मुलाखतीत मोठे वक्तव्य, म्हणाला; “एवढं दडपण असतं की…”

आयसीसीच्या एका सूत्राने सांगितले की, “मॅच फिक्सिंगबाबत युगांडाच्या खेळाडूशी संपर्क साधण्यात आला ही फारशी आश्चर्यकारक बाब नाही. मोठ्या संघांच्या सामन्यांच्या वेळेस सहयोगी राष्ट्र संघांना यासाठी लक्ष्य केलं जातं, पण या प्रकरणात त्या खेळाडूने वेळीच आयसीसीशी संपर्क साधला.”

हेही वाचा – VIDEO : ‘तो संघात राहण्याच्याही लायक नाही..’, वीरेंद्र सेहवाग टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर ‘या’ फलंदाजावर संतापला

टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये युगांडाने एकूण ४ गट सामने खेळले. युगांडाचा संघ वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि पापुआ न्यु गिनीसोबत क गटात होता. गट सामन्यांमध्ये युगांडा संघाने १ सामना जिंकला आणि ३ सामने गमावले. युगांडाने पीएनजीवर ३ गडी राखून विजय मिळवला होता. अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्ध संघाला पराभव पत्करावा लागला.