न्यूयॉर्क : भारताच्या शीर्ष फळीतील फलंदाजांचा प्रयत्न अमेरिकेविरुद्ध बुधवारी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी करत आगामी सामन्यांकरिता लय मिळवण्याचा राहील. अमेरिकेच्या संघात अनुभवाची कमतरता असली, तरीही त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय संघ त्यांना हलक्याने घेणार नाही. भारतीय संघाने या सामन्यात विजय नोंदवल्यास त्यांचे तीन सामन्यांत आठ गुण होतील. त्यानंतर त्यांचे ‘सुपर एट’ फेरीतील स्थानही निश्चित होईल.

हेही वाचा >>> T20 WC 2024 : मोठ्या उलथापालथीने बिघडवले बड्या संघांचे गणित, लहान संघांनी दिला दणका, पाहा ‘सुपर-एट’चे समीकरण

Controversy over Arvind Yadav appointment in archery team sport
तिरंदाजी संघात यादव यांच्या नियुक्तीवरून नवा वाद; ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर संघटनेमध्येच आरोपप्रत्यारोप
Shashi Tharoor criticizes BCCI
IND vs SL : टीम इंडियाच्या निवडीवर शशी थरुर संतापले; म्हणाले, ‘ज्यांनी शतकं झळकावली त्यांनाच…’
Kamran Akmal and Harbhajan Singh Video viral
WCL 2024 : शीख धर्माबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कामरान अकमल-हरभजन सिंग आमनेसामने, VIDEO व्हायरल
Abhishek Sharma's Embarrassing Record
IND vs ZIM 1st T20 : पदार्पणातच अभिषेक शर्माला चाहत्यांनी करुन दिली धोनीची आठवण, नेमकं काय आहे कारण?
Rishabh Pant Medical Time Out Delayed The Game with Perfect Move
T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण
Rishabh Pant 'Casually' Does A Dhoni; Stumps Moeen Ali Nonchalantly Off Axar
IND vs ENG : ऋषभ पंतच्या चपळाईने चाहत्यांना झाली धोनीची आठवण, मोईन अलीच्या स्टंपिगचा VIDEO व्हायरल
Rohit Sharna
IND vs ENG : “एका क्षणी असं वाटलेलं…”, रोहित शर्माने व्यक्त केली भीती; इंग्लंडवरील विजयाबद्दल म्हणाला…
England held to draw in Slovenia
युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : इंग्लंडचा पुन्हा निराशाजनक खेळ; गटात अव्वल राहिल्यानंतरही सावध पवित्र्यामुळे टीकेचे धनी

नसाऊ कौंटी मैदान हे फलंदाजांसाठी अनुकूल नसल्याचे गेल्या काही सामन्यांतून समोर आले आहे. यजमान अमेरिकेने सर्वांच्या अपेक्षांच्या विपरीत कामगिरी केली असून त्यांनी पहिल्या लढतीत पाकिस्तानला नमवत लक्ष वेधले. अमेरिकेच्या संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. यामध्ये सौरभ नेत्रावळकर आणि हरमीत सिंग यांचाही समावेश आहे. या दोघांनीही संघाकडून चमकदार कामगिरी केली आहे. खेळपट्टीमुळे दोन्ही संघांमधील अंतरही कमी केले आहे. मात्र, तरीही अमेरिकेला भारतीय संघाला नमवणे सोपे नसेल. अमेरिकेच्या संघात मूळचे भारतीय असलेले आठ खेळाडू आहेत. यासह पाकिस्तानातील मूळचे दोन, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सचा प्रत्येकी एक खेळाडू त्यांच्या संघात आहे. संघात मोनांक पटेल, हरमीत, नेत्रावळकर, जेसी सिंग व नोशतुश केंजीगे यांचा भारताच्या फलंदाजांसमोर त्यांचा चांगला कस लागेल.

● वेळ : रात्री ८ वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, , १ हिंदी, हॉटस्टार अॅप.