भारताचा महान फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आशिया चषकात त्याने आपली जुनी लय परत मिळवली आहे. कोहलीने टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध नाबाद ८२ धावा केल्यानंतर नेदरलँड्सविरुद्ध नाबाद ६२ धावांची खेळी केली. तो आतापर्यंत या स्पर्धेत एकदाही बाद झालेला नाही. यादरम्यान कोहलीने एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने यावर्षी १००० धावा पूर्ण केल्या आहेत.

कोहलीने २०१९ नंतर एका वर्षात १००० धावांचा टप्पा ओलांडला आहे. त्याची बॅट २०२० आणि २०२१ मध्ये तळपली नाही. या कारणावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती. अनेक क्रिकेट तज्ज्ञांनीही त्याची संघातून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती, पण कोहलीने सर्व टीकाकारांची बोलती आता आपल्या बॅटने बंद केली आहे.

Virat Kohli And Umpire Argument Video
KKR vs RCB : आऊट दिल्यानंतर विराट कोहली संतापला, अंपायरशी वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Green signal for Suryakumar Yadav to play in IPL
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता
Virat Kohli
सातत्यपूर्ण कामगिरीचा बंगळूरु, कोलकाताचा प्रयत्न; ‘आयपीएल’मध्ये आज आमनेसामने

विराटने यावर्षी २८ सामन्यांच्या ३१ डावांमध्ये १०२४ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची सरासरी ३९.३८ इतकी राहिली आहे. त्याने एक शतक आणि नऊ अर्धशतके झळकावली आहेत. आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धची नाबाद १२२ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

कोहलीने २०२२ मध्ये २२ सामन्यांच्या २४ डावांमध्ये ३६.६० च्या सरासरीने ८४२ धावा केल्या. या काळात त्याने सात अर्धशतके झळकावली होती. त्याची सर्वोच्च धावसंख्या ८९ धावांची होती. त्याचबरोबर, २०२१ मध्ये, त्याने २४ सामन्यांच्या ३० डावांमध्ये ९६४ धावा केल्या. या काळात विराटची सरासरी ३७.०७ होती. त्याने नऊ अर्धशतके झळकावली होती. ज्यामध्ये नाबाद ८० ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती.

हेही वाचा – T20 World Cup 2022: पाच वर्षानंतर पुनरागमन केलं अन् थेट दोन शतकं झळकावत विक्रमवीर झाला

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर कोहलीने घेतला होता ब्रेक-

जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर कोहलीने ब्रेक घेतला होता. आशिया चषकात तो परतला. या स्पर्धेत त्याने आपले ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. विराटला हजार दिवसांनंतर शतक झळकावण्यात यश आलं होतं. त्याने आशिया चषकाच्या पाच डावांत ९२ च्या सरासरीने २७६ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली. आशिया चषकानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मालिकेत दोन अर्धशतके झळकावले.

टी-२० विश्वचषकात कोहली भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज –

सध्याच्या टी-२० विश्वचषकात कोहली भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने दोन सामन्यांत १४४ धावा केल्या. विराटने दोन्ही सामन्यात अर्धशतके झळकावली आहेत. टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत तो चौथ्या स्थानावर आहे. त्याच्यापेक्षा जास्त धावा श्रीलंकेच्या कुसल मेंडिस (१७६ धावा), नेदरलँड्सच्या मॅक्स ओडाड (१५३ धावा) आणि झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा (१४५ धावा) यांनी केल्या आहेत.

हेही वाचा – PAK vs ZIM: सिकंदर रझाने मैदानात का केली खुणवाखुणवी? झिम्बाम्बावेचा कर्णधार म्हणतो, “आता माझं दिवाळं..”

कोहलीची जयवर्धनेच्या विक्रमावर नजर –

श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराट यावेळी त्याचा विक्रम मोडू शकतो. जयवर्धनेने स्पर्धेतील ३१ सामन्यांत ३९.०७ च्या सरासरीने आणि १३४.७४ च्या स्ट्राइक रेटने १०१६ धावा केल्या. त्याचवेळी कोहलीने २३ सामन्यात ८९.९० च्या सरासरीने आणि १३२.०४ च्या स्ट्राईक रेटने ९८९ धावा केल्या आहेत. कोहली आता जयवर्धनेच्या २७ धावांनी मागे आहे.