Team India T20 World Cup Victory Parade Rally from Marine Drive to Wankhede Stadium Highlights: टी-२० विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकून भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी परतला. बार्बाडोसच्या मैदानावर अंतिम सामना जिंकल्यानंतर, तेथे आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया लगेच निघू शकली नाही. टीम इंडियाचे सर्व खेळाडू बार्बाडोसहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने थेट दिल्लीला पोहोचल्यानंतर हॉटेलकडे रवाना झाले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी टीम सकाळी ११ वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचली. यानंतर टीम इंडिया मुंबईत पोहोचली. जिथे विजयी परेड पार पडली आणि शेवटी वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

Live Updates

India T20 World Cup 2024 Victory Parade Highlights : विश्वविजेता भारतीय संघ आज म्हणजेच ४ जुलै रोजी पहाटेच दिल्लीत दाखल झाला होता. यानंतर संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेट घेतली. त्यानंतर या संघाची विजय परेड वानखेडेवर स्टेडियमवर संपन्न झाली.

09:10 (IST) 4 Jul 2024
Team India Arrival Live: कॅप्टन रोहित शर्माने केला भांडगा नृत्य

09:08 (IST) 4 Jul 2024

09:02 (IST) 4 Jul 2024

07:39 (IST) 4 Jul 2024
Team India Arrival Live: ऋषभ पंतच्या हातात ट्रॉफी

भारतीय संघ आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये दाखल झाला असून ऋषभ पंत भारताची ट्रॉफी घेऊन जात आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी हॉटेलमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. केक आणि सजावटीनेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

#watch | Rishabh Pant carrying the T20 World Cup trophy at ITC Maurya Hotel in Delhi. pic.twitter.com/hvzsMWlZLU
— ANI (@ANI) July 4, 2024
#watch | Men’s Indian Cricket Team at ITC Maurya Hotel in Delhi, after winning the #t20worldcup2024 trophy.

India defeated South Africa by 7 runs on June 29, in Barbados. pic.twitter.com/bqpEmcynmp
— ANI (@ANI) July 4, 2024
07:36 (IST) 4 Jul 2024
Team India Arrival Live: हॉटेलमध्ये दाखल

भारतीय संघ दिल्ली विमानतळावरून आयटीसी मौर्या हॉटेलकडे रवाना झाला असून बसमधून जातानाची दृश्ये समोर आली आहेत. भारतीय संघाच्या दोन बस आणि त्यांच्या ताफ्यासोबत मोठा कडक बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

#watch | Delhi: Men’s Indian Cricket Team en route to ITC Maurya, after winning the #t20worldcup2024 trophy.

(Visuals from Dhaula Kuan) pic.twitter.com/SgvBghapbQ
— ANI (@ANI) July 4, 2024
07:34 (IST) 4 Jul 2024
Team India Arrival Live: बसमधील व्हीडिओ

भारतीय संघ बसमध्ये बसल्याचे व्हीडिओ फोटो समोर आले आहेत. विराट कोहली टीम बसमध्ये बसला आहे आणि यानंतर संघ हॉटेलकडे रवाना होईल.

#watch | Delhi: Team India’s bus at Terminal 3 of Delhi airport as the Men’s Indian Cricket Team has landed at the airport after winning the #t20worldcup2024 trophy. pic.twitter.com/gqHBbn1357
— ANI (@ANI) July 4, 2024
07:32 (IST) 4 Jul 2024
Team India Arrival Live: टीम बसमध्ये जाताना रोहितने ट्रॉफी उंचावली

भारतीय संघ दिल्ली विमानतळावरून हॉटेलकडे निघाला आहे. यादरम्यान रोहित शर्मा हातात ट्रॉफी होती आणि चाहत्यांना पाहत त्याने हि ट्रॉफी उंचावली आणि चाहत्यांचा एक जल्लाेष पुन्हा पाहायला मिळाला.

https://platform.twitter.com/widgets.js
07:28 (IST) 4 Jul 2024
Team India Arrival Live: टीम इंडिया दिल्ली विमानतळावर दाखल

टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावणारी टीम इंडिया दिल्ली विमानतळावर पोहोचली आहे. याची माहिती आणि व्हीडिओ वृत्तसंस्था ANI ने दिली आहे. आता काही वेळातच टीम इथून हॉटेलकडे रवाना होईल.

#watch | Coach Rahul Dravid, Yuzvendra Chahal and Jasprit Bumrah along with Team India arrive at Delhi airport, after winning the #t20worldcup2024 trophy. pic.twitter.com/wYCx91SkpP
— ANI (@ANI) July 4, 2024
07:24 (IST) 4 Jul 2024
Team India Arrival Live: चाहत्यांची गर्दी

विश्वविजेत्या भारतीय संघाला पाहण्यासाठी दिल्ली विमानतळावर चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. एएनआयने शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये चाहत्यांचा जल्लोष आणि त्यांची गर्दी पाहता येत आहे. रात्री ३ वाजल्यापासूनच चाहते दिल्ली विमानतळाबाहेर तळ ठोकून बसले होते. एएनआय, पीटीआय या वृत्तसंस्थांनी याचे फोटो, व्हीडिओ शेअर केेल आहेत.

#watch | Delhi: Supporters gather at the airport to welcome Men’s Indian Cricket Team.

Team India will arrive at Delhi Airport after winning the #t20worldcup2024 trophy. pic.twitter.com/yQ4iEw4p0c
— ANI (@ANI) July 4, 2024


07:22 (IST) 4 Jul 2024
Team India Arrival Live: टीम इंडिया दिल्ली विमानतळावर दाखल

टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावणारी टीम इंडिया दिल्ली विमानतळावर पोहोचली आहे. याची माहिती आणि व्हीडिओ वृत्तसंस्था ANI ने दिली आहे. आता काही वेळातच टीम इथून हॉटेलकडे रवाना होईल.

07:21 (IST) 4 Jul 2024
Team India Arrival Live: AIC24WC सर्वाधिक सर्च

सध्या भारतात टीम इंडिया ज्या चार्टर्ड फ्लाइटने भारतात येत आहे त्याचं नाव AIC24WC आहे. यासाठी ही फ्लाईट कुठे आहे किती वाजता पोहोचेल याबाबत सर्वाधिक सर्च चाहत्यांकडून केलं जात होतं. रोहित शर्मा आणि ब्रिगेडच्या स्वागतासाठी भारतीय चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

07:19 (IST) 4 Jul 2024
Team India Arrival Live: विश्वविजेता भारतीय संघ

टी-२० विश्वचषक २०२४ च्या विजेतेपदासह संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिलेला संघ भारतात दाखल झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने तब्बल दशकभराचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. २९ जुलै रोजी झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. आता हा भारतीय संघ मायदेशात दाखल झाला असून चाहत्यांसोबत हा आनंद संघ साजरा करताना दिसणार आहे.

Team India Victory Parade Highlights: टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ अगोदर दिल्लीत आणि नंतर मुंबईत पोहोचला. जिथे टीम इंडियाच्या खेळाडूंची विजयाची परेड काढली आणि नंतर बीसीसीआयने खेळाडूंना १२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले.