Trent Boult Last T20 World Cup: न्यूझीलंड यंदाच्या टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. किवी संघाला तीनपैकी दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजकडून न्यूझीलंड संघाला मोठा पराभव पत्करावा लागला. युगांडाविरुद्धचा सामना संघाने ९ विकेट्सने जिंकला. त्याचबरोबर पापुआ न्यू गिनीविरुद्धचा एक सामना बाकी असला, तरी त्याआधीच किवी संघ गुणांच्या आधारे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. किवी संघाच्या अखेरच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज ट्रेंट बोल्टने मोठी घोषणा केली आहे.

युगांडाविरूद्धच्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना बोल्टने सांगितले की, हा त्याचा शेवटचा टी-२० विश्वचषक असेल. म्हणजेच २०२६ च्या टी-२० विश्वचषकात तो खेळताना दिसणार नाही. बोल्ट पत्रकार परिषदेत म्हणाला- “हा माझा शेवटचा टी-२० विश्वचषक असेल. मला एवढेच म्हणायचे आहे.” ट्रेंट बोल्टच्या या वक्तव्यानुसार १७ जून रोजी होणारा पापुआ न्यू गिनीविरूद्ध होणारा न्यूझीलंडचा सामना हा त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा वर्ल्डकप सामना असणार आहे. बोल्टने पत्रकार परिषदेत न्यूझीलंडच्या खराब कामगिरीवरही वक्तव्य केले. तो म्हणाला- “आम्हाला अशी सुरूवात अपेक्षित नव्हती. हे सर्व पचायला जड जात आहे. आम्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकलो नाही याचा विचार करून वाईट वाटतं आहे. तरीही जेव्हा तुम्हाला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते तेव्हा तुम्हाला तुमचा अभिमान वाटतो.”

हेही वाचा – गिलने रोहित शर्माला केलं अनफॉलो? शिस्तभंग केल्याने वर्ल्डकप संघातून शुबमनला रिलीज करणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

बोल्टने डिसेंबर २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो संघाचा मुख्य गोलंदाज आहे. बोल्टच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंड संघाला अनेकदा विजय मिळवून दिला. बोल्टने २०१४ पासून टी-२० वर्ल्ड कपच्या ४ हंगामात सहभागी झाला आहे.

हेही वाचा – IND vs USA: “तू सूर्यकुमारला का आऊट नाही केलंस?”, नवज्योत सिंग सिद्धूने विचारलेल्या प्रश्नावर नेत्रावळकरने दिले उत्तर; म्हणाला- ‘त्याचा झेल…’

ट्रेंट बोल्टचा अखेरचा टी-२० वर्ल्डकप

ट्रेंट बोल्टचा वर्ल्डकपमधील रेकॉर्डही तगडा आहे. बोल्टने टी-२० वर्ल्डकपमधील १७ सामन्यांमध्ये ६.०७ च्या इकोनॉमी रेटने ३२ विकेट्स घेतल्या आहेत. १३ धावांमध्ये ४ विकेट्स ही त्याची सर्वाेत्तम गोलंदाजी संख्या आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये २०१३ ते २०२४ च्या कालावधीत ६० सामन्यांमध्ये ७.७५ च्या इकोनॉमी रेटने ८१ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ मेडेन षटके टाकली आहेत.

हेही वाचा – T20 WC 2024: भारत वि ऑस्ट्रेलिया सुपर८ फेरीत येणार आमनेसामने, ICCने केलं जाहीर; पाहा टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक

बोल्टची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

बोल्ट २०२२ मध्ये केंद्रीय करारातून बाहेर झाला होता, हा निर्णय त्याने स्वत घेतला हा. ३४ वर्षीय बोल्ट सध्या तो जगभरात फ्रँचायझी क्रिकेट खेळताना दिसतो. आतापर्यंत त्याने ७८ कसोटी, ११४ एकदिवसीय आणि ६० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने कसोटीत ३१७, एकदिवसीय सामन्यात २११ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ८१ विकेट घेतले आहेत. बोल्टच्या नावावर अनेक विक्रम आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० विकेट घेणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे.