क्रिकेटच्या पटलावर भारतीय क्रिकेट संघ महासत्ता मानला जातो. क्रिकेटच्या परिघात आता कुठे रांगू लागलेल्या अमेरिकेने बलाढ्य अशा भारतीय संघाला न्यूयॉर्कच्या मैदानावर झुंजवलं पण एका तांत्रिक नियमाने त्यांच्या आव्हानातलं त्राणच निघून गेलं. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे ही मुंबईकर जोडगोळी भारतीय संघाला विजय मिळवून देण्याच्या मोहिमेवर होती. अत्यंत कठीण अशा खेळपट्टीवर एकेरी-दुहेरी धावा काढणंही कठीण होतं. सूर्या-शिवम जोडीने संयम बाळगला आणि मोक्याच्या क्षणी नियम त्यांच्या मदतीला धावून आला.

हेही वाचा – IND v USA: बोरिवलीतील अनेक खेळाडू या सामन्यात असं शास्त्रींनी म्हणताच रोहित शर्मा पाहा काय म्हणाला, “त्यांच्यासोबत एकत्र क्रिकेट…”

Athletes of Indian Heritage Look To Shine At Paris Olympics
Paris Olympics 2024 : भारतासाठी नव्हे तर अमेरिका-कॅनडाकडून खेळणार ‘हे’ पाच भारतीय वंशाचे खेळाडू, जाणून घ्या कोण आहेत?
Japan womens gymnastics Team captain of Paris Olympics Games 2024 for smoking
Paris Olympics 2024 : सिगारेट ओढणे ‘या’ स्टार खेळाडूला पडले चांगलेच महागात, ऑलिम्पिकमधून पाठवण्यात आले मायदेशी
lokmanas
लोकमानस: कोणीही जिंकणे जगासाठी धोक्याचेच
copa america 2024 final argentina vs colombia match prediction
Copa America 2024 : तिहेरी मुकुटाची अर्जेंटिनाला संधी; कोपा अमेरिकाच्या अंतिम लढतीत कोलंबियाचे आव्हान
Punjab and haryana court
ऑस्ट्रेलियात हुंड्यासाठी छळ, भारतात गुन्हा दाखल; पण न्यायलयाने रद्द केला FIR, कारण काय? न्यायमूर्ती म्हणाले…
germany vs spain euro 2024
विश्लेषण: फुटबॉलमध्ये ‘हँडबॉल पेनल्टी’ कशी देतात? युरो स्पर्धेत स्पेनविरुद्ध जर्मनीवर अन्याय झाला का?
Biden and Trump to face off in first US presidential debate:
वादाच्या पहिल्या फेरीत बायडेन निस्तेज; अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षात उमेदवारीवरून चिंता
Copa America football tournament Venezuela enters the quarter finals sport news
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा: व्हेनेझुएलाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

नेमकं काय झालं?
१५वं षटक संपलं तेव्हा भारताची स्थिती ७६/३ अशी होती. १११ धावांचं लक्ष्य अवघडच भासत होतं. मात्र या षटकानंतर पंच पॉल रायफेल यांनी भारतीय संघाला पाच धावा पेनल्टी मिळणार असल्याची घोषणा केली. आयसीसी ट्वेन्टी२० वर्ल्डकपच्या प्लेइंग कंडिशन्स ४१.९.४ नियमानुसार गोलंदाजी करणाऱ्या संघाला नवं षटक सुरू करण्यासाठी ६० सेकंद मिळतात. निर्धारित वेळेत षटक सुरू न झाल्यास इशारा देण्यात येतो. तीनपेक्षा जास्त इशारे मिळाले तर चौथ्या वेळेस प्रतिस्पर्धी संघाला पेनल्टी बहाल करण्यात येते. हा नियम नव्याने लागू करण्यात आला आहे. अमेरिकेने डावात नव्या षटकापूर्वी अतिरिक्त वेळ घेतला आणि तोच त्यांच्या अंगलट आला. १६व्या षटकात सूर्या-शिवम जोडीने ६ धावा काढल्या. यामध्ये ५ पेनल्टीच्या धावा जोडण्यात आल्या. यामुळे भारताची धावसंख्या ८७/३ अशी झाली आणि लक्ष्य एकदम खाली आलं. ३० चेंडूत ३५ असं लक्ष्य ३० चेंडूत ३० झाल्याने सूर्या-शिवम जोडीने सुस्कारा टाकला.

हेही वाचा – संधी, स्थलांतर, वर्ल्डकप

अशी पेनल्टी बसणारा अमेरिका हा पहिलाच संघ ठरला. स्टॉप क्लॉकच्या माध्यमातून षटकांची गती राखली जावी यासाठी १ जूनपासून वनडे आणि ट्वेन्टी२० प्रकारात हा नियम लागू करण्यात आला. हा अगदी नवीन नियम असल्याने अमेरिकेचा कर्णधार आरोन जोन्सला याची कल्पना नव्हती. दोन्ही पंचांनी हा नियम त्याला समजावून सांगितला.

हेही वाचा – IND vs USA : सौरभ नेत्रावळकरने रचला इतिहास! सॉफ्टवेअर इंजिनिअरने रोहित-विराटचा कोड केला क्रॅक, पाहा VIDEO

काही दिवसांपूर्वी बांगलादेश संघाला लेगबाईज संदर्भात नियमाचा फटका बसला होता.बांगलादेशला चार धावा देण्यात आल्या नाहीत. न्यूयॉर्कच्या याच खेळपट्टीवर बांगलादेशचा संघही छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करत होता. १७व्या षटकात ओटेनिल बार्टमनचा चेंडू महमदुल्लाने तटवून काढण्याचा प्रयत्न केला. चेंडू महमदुल्लाच्या पॅडला लागून चौकार गेला मात्र दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी बादचं अपील केलं आणि पंचांनी बादचा कौल दिला. बाद दिल्यामुळे चेंडू डेड झाला. त्यामुळे बांगलादेशला चेंडू सीमापार जाऊनही चार धावा मिळू शकल्या नाहीत. योगायोग म्हणजे महमदुल्लाने रिव्ह्यूचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय बदलत महमदुल्ला बाद नसल्याचा निर्वाळा दिला. महमदुल्लाला जीवदान मिळालं पण बांगलादेशला चार धावा मिळू शकल्या नाहीत. बांगलादेशच्या संघाला चार धावांनीच पराभवाला सामोरं जावं लागलं.

हेही वाचा – T20 WC 2024: मुंबईचा मराठमोळा इंजिनियर कसा झाला अमेरिकेचा फास्ट बॉलर; आता भारताविरुद्धच परजणार अस्त्रं

पाकिस्तानविरुद्ध विजयी मात्र भारताविरुद्ध पराभूत झाल्याने अमेरिकेला आयर्लंडविरुद्ध विजय मिळवणं क्रमप्राप्त आहे.