ICC T20 World Cup 2024, USA vs IND Highlights: भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. भारताने बुधवारी अमेरिकेवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर अमेरिकेने १११ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे भारताने १८.२ षटकांत तीन गडी गमावून पूर्ण केले. या विजयासह भारताने सुपर८ फेरीत प्रवेश केला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. विराट कोहली पहिल्याच षटकात गोल्डन डकचा बळी ठरला. तर तिसऱ्या षटकात रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. अमेरिकेचा महत्त्वाचा गोलंदाज सौरभ नेत्रावळकरने या दोघांच्या विकेट्स आपल्या नावे केल्या.

Live Updates

T20 World Cup 2024, United States of America vs India Highlights: न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी स्टेडियमवर भारत वि अमेरिका यांच्यात टी-20 विश्वचषकातील सामना खेळवला गेला. ज्यात भारतीय गोलंदाज आणि सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीसह भारताने विजय मिळवला.

23:40 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: सूर्याचे अर्धशतकासह भारताचा विजय

भारताने अमेरिकेवर ७ विकेट्सवर विजय मिळवत टी-२० विश्वचषकाच्या सुपर८ फेरीत धडक मारली आहे. सुर्यकुमार यादवचे संयमी अर्धशतक आणि शिवम दुबेसोबतची भागीदारी संघासाठी महत्त्वाची ठरली. सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारासह मैदानावर टिकून राहत अर्धशतकी कामगिरी केली. तर शिवम दुबेने ३५ चेंडूत एक चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या. या दोघांची भागीदारी भारताला विजय मिळवण्यात मोठी भूमिका बजावणारी ठरली. पॉवरप्लेमध्येच भारताने विकेट्स गमावल्या पण सूर्या आणि शिवमने मैदानावर कायम राहत चांगली कामगिरी केली.

23:23 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: भारताला मिळाल्या ५ पेनल्टी धावा

१६ वे षटक सुरू होण्यापूर्वी भारताला ५ अतिरिक्त धावा देण्यात आल्या. अमेरिकेच्या कर्णधाराने ६० सेकंदांच्या आत षटक पूर्ण न केल्याने या धावा मिळाल्या. कर्णधाराला दोन वेळा ताकीद देण्यात आली पण तिसऱ्यांदा ही चूक झाल्याने ५ धावा देण्यात आल्या.

23:18 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: शिवम दुबेचा षटकार

सूर्याचा १४व्या षटकातील शेवटच्या चेंडूवरचा एक चौकार आणि १५व्या षटकातील कोरे अँडरसनला लगावलेला शिवम दुबेचा एकच दणदणीत षटकार सामन्याचा रोख बदलणारा ठरला. आता १५ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३ बाद ७६ धावा आहे. भारताला ३० चेंडूत ३५ धावांची आवश्यकता आहे.

22:55 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: १० षटकांत भारताने केल्या इतक्या धावा

१० षटकांत भारताने ३ बाद ४७ धावा केल्या आहेत. भारताला विजयासाठी ६० चेंडूत ६४ धावांची आवश्यकता आहे. भारताकडून सध्या सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेची जोडी मैदानात आहे.

22:39 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: ऋषभ पंत क्लीन बोल्ड

आठव्या षटकातील अली खानच्या भेदक गोलंदाजीवर ऋषभ पंत क्लीन बोल्ड झाला. पंतच्या विकेटसह भारताला मोठा धक्का बसला आहे. यंदाच्या विश्वचषकात भारताकडून पंतने सर्वाेत्कृष्ट फलंदाजी केली आहे. ८ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३ बाद ३९ धावा आहे.

22:36 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: पॉवरप्लेनंतर भारत

भारताने पॉवरप्लेमध्ये २ विकेट गमावत ३३ धावा केल्या. भारताची टी-२० वर्ल्डकपमधील ही अजून एक कमी धावसंख्या आहे.

22:24 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: पाच षटकांनंतर भारत

भारताने आपल्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात गमावले. यासह भारताने ५ षटकांत २५ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत भारताचा डाव सावरत आहेत.

22:09 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: रोहित शर्मा स्वस्तात परतला

तिसऱ्या षटकातील सौरभ नेत्रावळकरच्या गोलंदाजीवर दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्मा झेलबाद झाला. रोहित शर्माला बाद करण्यात दोन्ही मुंबईकरांचा हात होता. सौरभ नेत्रावळकरने त्याला गोलंदाजी केली तर हरमीत सिंगने त्याला झेलबाद केले. हरमीत सिंग हा रोहितचा शालेय मित्र आहे. नेत्रावळकरने भारताच्या दोन्ही सलामीवीरांना स्वस्तात झेलबाद केले. विराट खातेही न उघडता तर रोहित ३ धावा करत बाद झाला. भारतीय संघ सध्या १० धावांवर खेळत आहे. तर ऋषभ पंत आणि सूर्याची जोडी आहे.

21:59 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: विराट कोहली गोल्डन डक

अमेरिकेने दिलेल्या ११२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा उतरला आहे. अमेरिकेकडून सौरभ नेत्रावळकरकडे चेंडू होता. डावातील दुसऱ्याच चेंडूवर विराट कोहली गोल्डन डकवर बाद झाला. रोहितने पहिल्या चेंडूवर एक धाव घेत विराट कोहलीली स्ट्राईक दिली आणि नेत्रावळकरने टाकलेल्या दुसऱ्या चेंडूने बॅटची कड घेतली आणि चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातात गेला.

21:44 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: दबावातही अमेरिकेची शानदार फटकेबाजी

सिराजच्या परफेक्ट थ्रोसह शेवटच्या चेंडूवर धावबाद करत ८ विकेटसह अमेरिकेने ११० धावा केल्या आहेत. यासह अमेरिकेने भारताला विजयासाठी ११२ धावांचे आव्हान दिले आहे. अमेरिकेकडून स्टीव्हन टेलरने २ षटकारांसह २४ धावा, नितीश कुमारने १ षटकार २ चौकारासह सर्वाधिक २७ धावा केल्या. तर इतर फलंदाजांनी धावांचे योगदान देण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या गोलंदाजीसमोर फार काळ टिकू शकले नाही. अर्शदीपने उत्कृष्ट गोलंदाजी करत ४ षटकांत ९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तर हार्दिकने २ आणि अक्षरने १ विकेट घेतली. ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराजच्या कॅचेसने सर्वांचे लक्ष वेधले.

21:32 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: अर्शदीपच्या खात्यात चौथी विकेट

१८ व्या षटकातील अर्शदीपच्या तिसऱ्या चेंडूवर हरमीत सिंग झेलबाद झाला. चौकारासाठी जाणारा चेंडू पंतने हवेत झेप घेत शानदार झेल टिपला. हरमीतने संघासाठी १० धावा केल्या, पण त्याने बुमराहच्या षटकात षटकार लगावत भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अर्शदीपने यासह चौथी विकेट मिळवली आणि अमेरिकेनेही आपल्या १०० धावांचा पल्ला गाठला.

21:29 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: कोरे अँडरसन झेलबाद

१७ व्या षटकातील हार्दिकच्या पाचव्या चेंडूवर कोरे अँडरसन झेलबाद झाला. ऋषभ पंतने पुन्हा एकदा एका शानदार झेल घेत संघाला मोठी विकेट मिळवून दिली.

21:25 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: बुमराहच्या षटकात १४ धावा

१६व्या षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर कोरे अँडरसनने चौकार लगावला. तर चौथ्या चेंडूवर हरमीत सिंगने एक दणदणीत षटकार लगावला. यावरून हरमीतच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

21:16 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: मोहम्मद सिराजचा आकर्षक झेल

अर्शदीपच्या १५ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर फटकेबाजी करणारा नितीश कुमार अखेरीस झेलबाद झाला. सीमारेषेवर सिराजने एक आकर्षक झेल टिपला. षटकारासाठी जाणारा चेंडू हवेत उभी झेप घेत टिपला आणि एक यशस्वी झेल टिपला.

21:13 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: नितीश कुमारची शानदार फटकेबाजी

हार्दिकच्या १३ व्या षटकात एक चौकार आणि एका षटकारासह १२ धावा केल्या. नितीश कुमार चांगल्याच फॉर्मात असून संघाच्या धावांमध्ये भर घालत आहे. १३ षटकांनंतर अमेरिकेची धावसंख्या ४ बाद ७२ धावा आहे.

21:03 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: अक्षर पटेलच्या खात्यात महत्त्वाची विकेट

१२ व्या षटकात अक्षर पटेल गोलंदाजीला आला. १२ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर टेलरने अक्षर पटेलला एक शानदार षटकार लगावला. पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळायला गेला आणि चेंडू बॅटला लागत स्टंपवर जाऊन आदळला अन् क्लीन बोल्ड झाला. यासह अमेरिकेने ६ षटकांत ४ विकेट गमावत ५९ धावा केल्या आहेत.

20:55 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: १० षटकांनंतर अमेरिकेची धावसंख्या

१० षटकांत अमेरिकेने ३ बाद ४२ धावा केल्या आहेत. सध्या अमेरिकेकडून स्टीव्हन टेलर आणि नितीश कुमारची जोडी मैदानावर कायम आहे. टेलर संधी मिळताच मोठे फटके मारताना दिसला.

20:55 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: शिवम दुबेच्या षटकात ११ धावा

शिवम दुबेच्या षटकात ११ धावा केल्या. दुबेला अमेरिकेच्या डावातील नववे षटक दिले होते, या षटकातील पहिल्या चेंडूवर बॅटची कड घेत चेंडू स्लिपच्या दिशेने चौकारासाठी गेला. यानंतर दुबेने चांगली गोलंदाजी केली. पण पाचव्या चेंडूवर टेलरने एक मोठा षटकार लगावला. यासह नऊ षटकात अमेरिकेची धावसंख्या ३७ वर आली.

20:38 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: भारताच्या खात्यात तिसरी मोठी विकेट

सातव्या षटकातील हार्दिकच्या षटकात भारताला मोठी विकेट मिळाली आहे. वर्ल्डकपमध्ये सर्वात शानदार फलंदाजी करणारा अॅरोन जोन्स हा स्वस्तात बाद झाला आहे. हार्दिकच्या दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात जोन्स सीमारेषेवर झेलबाद झाला.

20:35 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: पॉवरप्लेनंतर अमेरिका

पॉवरप्लेमध्ये अमेरिकेने २ बाद १८ धावा केल्या आहेत. अर्शदीपने पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेत अमेरिकेला धक्के देत त्यांच्यावर दबाव कायम ठेवला आहे. अॅरोन जोन्सने संघासाठी महत्त्वपूर्ण धावा करताना दिसत आहे.

20:25 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: ४ षटकांनंतर अमेरिकेची धावसंख्या

४ षटकांत अमेरिकेने २ चेंडूत १६ धावा केल्या आहेत. सिराजच्या चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अमेरिकेचा विस्फोटक फलंदाज अॅरोन जोन्सने दणदणीत षटकार लगावत धावाची महत्त्वपूर्ण भर घातली.

20:10 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: भारताच्या खात्यात दुसरी विकेट

अर्शदीपच्या पहिल्या षटकातील अखेरच्या चेंडूवर अमेरिकेला अजून एक धक्का बसला. ३ धावांवर भारताने २ विकेट घेतले आहेत. अर्शदीपने टाकलेल्या चेंडूची कड घेत चेंडू हवेत उंच उडाला, नॉन स्ट्रायकर एंडला धावत येत पंड्याने शानदार झेल टिपला.

20:03 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: भारताला पहिल्याच चेंडूवर विकेट

भारत अमेरिका सामन्याला सुरूवात झाली असून अर्शदीपच्या पहिल्याच चेंडूवर विकेट मिळाली आहे. अर्शदीपच्या पहिल्याच चेंडूवर शायन जहांगीर पायचीत झाला आणि एकही धाव न घेता विकेट मिळाली.

19:49 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: अमेरिका संघाची प्लेइंग इलेव्हन:

स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (यष्टीरक्षक), अॅरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरे अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावळकर, अली खान

19:48 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: भारताची प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

19:34 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: नाणेफेक

भारत अमेरिका सामन्यातील नाणेफेक भारताने जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण अमेरिकेचा नियमित कर्णधार मोनांक पटेलच्या जागी अॅरॉन जोन्स नाणेफेकीसाठी आला आहे, हा अमेरिकेसाठी मोठा धक्का आहे. दुखापत असल्याने मोनांक पटेल भारताविरूद्धचा सामना खेळणार नाही, अशी माहिती अमेरिकेच्या काळजीवाहू कर्णधाराने दिली आहे.

18:45 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: कोण गाठणार सुपर८

भारत आणि अमेरिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या ग्रुप स्टेजच्या सामन्यात अ गटातील कोणता संघ प्रथम सुपर८ मध्ये प्रवेश करेल हे आज ठरणार आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. जर अमेरिकेने आणखी एक अपसेट घडवला तर भारताला पुढे जाण्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल.

17:22 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: भारताच्या फलंदाजीवर नजर

अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात भारताच्या फलंदाजी युनिटवर लक्ष असणार आहे. अमेरिकेविरूद्धच्या सामन्यात भारताची फलंदाजी बाजू पूर्णपणे ढासळली होती. तर बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांसारख्या गोलंदाजांविरुद्ध तिहेरी अंक गाठणे अमेरिकेला कठीण जाईल.

16:58 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: अमेरिकेच्या संघातील भारतीय खेळाडू

मोनांक पटेल हा अमेरिकेच्या संघाचा कर्णधार आहे. मोनांक पटेल हा भारतीय असून त्याचा जन्म गुजरातमधील आहे. तर फलंदाज मिलिंद कुमार हा २०१८-१९ च्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने सिक्कीम संघाचे प्रतिनिधीत्त्व करताना १३३१ धावा केल्या. तर मुंबईचे दोन गोलंदाज म्हणजेच सौरभ नेत्रावळकर आणि हरमीत सिंग हेही अमेरिकेच्या ताफ्यात आहे. मुंबईत जन्मलेल्या या दोघांनीही २०१२ च्या अंडर-१९ विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

T20 WC 2024: मुंबईचा मराठमोळा इंजिनियर कसा झाला अमेरिकेचा फास्ट बॉलर; आता भारताविरुद्धच परजणार अस्त्रं
16:57 (IST) 12 Jun 2024
IND vs USA: अमेरिकेच्या संघातील निम्मे खेळाडू तर भारतीयच

अमेरिकेच्या संघात अनेक भारतीय वंशाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मोनांक पटेल, हरमीत सिंग, सौरभ नेत्रावळकर, मिलिंद कुमार, जसदीप सिंग इत्यादी खेळाडू हे भारतीय आहेत. यापैेकी काही खेळाडूंनी तर भारतासाठी अंडर-19 वर्ल्ड्कपमध्ये प्रतिनिधीत्त्व केलं आहे.

T20 WC 2024: हरमीत सिंह; रोहित शर्माचा मित्र, फिक्सिंगचा आरोप आणि ढवळून निघालेली कारकीर्द

ICC T20 World Cup 2024 USA vs IND Highlights : टी-२० विश्वचषकातील भारत वि अमेरिका सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडियाने अमेरिकेवर ७ विकेट्सने विजय मिळवत सुपर ८ मध्ये धडक मारली आहे.