USA vs IRE T20 World Cup 2024 Match: टी-२० विश्वचषक २०२४ मधील ३०वा सामना अमेरिका विरुद्ध आयर्लंडमध्ये आज शुक्रवार १४ जूनला खेळवला जाणार आहे. हा सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवला जाणार आहे. अमेरिका आणि आयर्लंडशिवाय पाकिस्तानचीही नजर या सामन्यावर असेल. फ्लोरिडामध्ये पावसाचे वातावरण आहे असल्याने या सामन्यावर पावसाचे सावट आहे, जर अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना रद्द झाला तर पाकिस्तानचा संघ सुपर८ साठी पात्र ठरणार का कसं आहे समीकरण जाणून घेऊया.

अ गटातून भारतानंतर अमेरिकेला तिकीट मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय संघ तीन पैकी तीन सामने जिंकत भारतीय संघ सुपर८ साठी पात्र ठरला. आयर्लंड वि पाकिस्तान सामना होणारे ठिकाण लॉडरहिल, फ्लोरिडामध्ये पाऊस पडत आहे. सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सुरू होईल, तर दुपारी १२ वाजल्यापासून पुराचा इशारा लागू होणार आहे. अशा परिस्थितीत सामना खेळवण्याची शक्यता फारच कमी आहे.

azam khan fitness mohammad hafeez
“संपूर्ण संघाला २ किमी धावण्यासाठी १० मिनिटं लागतात, पण आझम खान…”, फिटनेसवरून माजी क्रिकेटपटूचा टोला
naseem shah
USA VS IRE T20 World Cup: पाकिस्तान ट्वेन्टी२० वर्ल्डकपमधून माघारी; अमेरिकेचं सुपर८चं स्वप्न साकार
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
India to Face Australia in T20 World Cup 2024 Super Eight Stage
T20 WC 2024: भारत वि ऑस्ट्रेलिया सुपर८ फेरीत येणार आमनेसामने, ICCने केलं जाहीर; पाहा टीम इंडियाच्या सामन्यांचे वेळापत्रक
Saurabh Netrawalkar Statement on Suryakumar Yadav Dropped Catch
IND vs USA: “तू सूर्यकुमारला का आऊट नाही केलंस?”, नवज्योत सिंग सिद्धूने विचारलेल्या प्रश्नावर नेत्रावळकरने दिले उत्तर; म्हणाला- ‘त्याचा झेल…’
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा

हेही वाचा – T20 WC 2024: ‘हे तर टॉक्सिक वातावरण’, काम आणि क्रिकेट यामध्ये कसरत करणाऱ्या सौरभ नेत्रावळकरच्या कंपनीवर नेटीझन्सची टीका

जर अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांमध्ये १-१ गुण विभागून दिले जातील. या १ गुणासह अमेरिका संघाचे ५ गुण होतील ज्यामुळे तो सुपर८ साठी पात्र ठरेल. यानंतर स्पर्धेतील पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंडचा प्रवास संपणार आहे. कॅनडा आणि पाकिस्तानविरुद्धच्या स्पर्धेतील पहिले दोन सामने जिंकून अमेरिकेने ४ गुण मिळवले आहेत. यजमान संघ गुणतालिकेत भारतानंतर दुसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IND vs USA: “तू सूर्यकुमारला का आऊट नाही केलंस?”, नवज्योत सिंग सिद्धूने विचारलेल्या प्रश्नावर नेत्रावळकरने दिले उत्तर; म्हणाला- ‘त्याचा झेल…’

पाकिस्तान, कॅनडा आणि आयर्लंडला जास्तीत जास्त ४ गुण गाठण्याची संधी आहे. अशा स्थितीत अमेरिका विरुद्ध आयर्लंड सामना रद्द झाला तर अमेरिका ५ गुणांसह सुपर८ मध्ये पोहोचेल, तर इतर तीन संघ बाहेर होतील.

पुढील काही दिवस लॉडरहिलमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पाकिस्तानला सुपर८ मध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना प्रथम फ्लोरिडामध्ये पाऊस थांबण्यासाठी प्रार्थना करावी लागेल. याच मैदानावर १६ जून रोजी पाकिस्तानचा शेवटचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानला आयर्लंडविरूद्धचा सामना किंवा अमेरिकेचा सामना पावसामुळे रद्द होणं महागात पडेल.