युझवेंद्र चहल हा टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा एक भाग आहे, परंतु त्याला आतापर्यंत या स्पर्धेत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र, असे असूनही तो अनेकदा चर्चेत असतो. टी-२० विश्वचषकाचा ३० वा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्थमध्ये खेळला जात आहे. त्याच दरम्यान, पुन्हा एकदा युझवेंद्र चहलचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चहल अंपायरसोबत मस्ती करताना दिसत आहे.

हा व्हायरल व्हिडिओ भारतीय डावाच्या तिसऱ्या षटकाचा आहे. पारनेलच्या षटकातील पाचवा चेंडू केएल राहुलने मारला, त्यानंतर फिजिओ मैदानावर आला. यादरम्यान ऋषभ पंत आणि युझवेंद्र चहल यांनीही मैदानात पाणी आणि टॉवेल आणले. यादरम्यान एकीकडे ऋषभ पंत सहकारी खेळाडूंसोबत दिसला, तर दुसरीकडे युझवेंद्र चहल अंपायरसोबत मस्ती करताना दिसला. मस्ती करत असताना युजीने अंपायरला गुडघ्याला मारून त्रास दिला आणि त्याला मुक्की मारताना कॅमेरात कैद झाला. या मजेशीर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
Rishabh pant hitting bat screen video viral
IPL 2024, RR vs DC : ऋषभ पंतने आऊट झाल्यानंतर रागाच्या भरात असं काही केलं, ज्याचा VIDEO होतोय व्हायरल
IPL 2024 Shahrukh Khan Smoking in Stadium During Match Between KKR vs SRH Video Viral
IPL 2024 KKR vs SRH: शाहरूख खान कोलकाताच्या सामन्यादरम्यान करत होता धुम्रपान, व्हिडिओ व्हायरल

ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-२० विश्वचषकात युझवेंद्र चहलला अद्याप आपली फिरकी दाखवण्याची संधी मिळालेली नाही. वास्तविक, ऑस्ट्रेलियाच्या स्थितीचा स्पिनरला फारसा फायदा मिळत नाही, तर दुसरीकडे, युझवेंद्र चहल भारतीय संघाच्या प्लॅन आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये फिट दिसत नाही.

पर्थमध्ये खेळल्या जाणार्‍या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, येथे भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आक्रमणासमोर झुंजताना दिसले. सूर्यकुमार यादवने कठीण काळात ६८ धावांची शानदार खेळी खेळली, पण बाकीचे फलंदाज त्याला साथ देऊ शकले नाहीत, त्यामुळे संघाची धावसंख्या १३३ धावांपर्यंतच पोहोचली. लुंगी एनगिडीने ४, तर वेन पारनेलने ३ बळी घेतले.

हेही वाचा – T20WC 2022 : ‘जो गेम सोबत जो गेम करेल… ; IND vs SA सामन्यावर पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे मोठं वक्तव्य