Virat Kohli Salute Celebration Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी करणारा विराट कोहली आजच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यानंतर पुन्हा चर्चेत आहेत. या सामन्यामध्ये विराटला नावाला साजेशी खेळी करण्यात अपयश आलं पण त्याने पकडलेला एक झेल आणि त्यानंतर केलेलं सेलिब्रेशन मात्र चर्चेत आहे. विशेष म्हणजे १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या सलामीवीराचा विराटच्या या भन्नाट क्षेत्ररक्षणामुळे सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर तंबूत परतावं लागलं.

नक्की पाहा >> World Cup: चार फोटो, एक शब्द अन् १० हजारांहून अधिक शेअर्स… Ind vs Zim सामन्यानंतर विराटने केलेल्या पोस्टची चर्चा

MS Dhoni's surprise visit to RCB dressing room
VIDEO: RCB vs CSK सामन्यापूर्वी एमएस धोनी गेला आरसीबीच्या ड्रेसिंग रूममध्ये, पाहा नेमकं करतोय तरी काय
Afghanistan Fan Misbehaves With Shaheen Afridi Video Viral
IRE vs PAK 2nd T20I : अफगाणिस्तानच्या चाहत्याने शाहीन आफ्रिदीशी केले गैरवर्तन, VIDEO होतोय व्हायरल
Virat Umpire's Verbal fight during RCB vs DC match
RCB vs DC : लाइव्ह मॅचमध्ये विराट कोहलीने अंपायरशी घातला वाद, जाणून घ्या काय होतं नेमकं कारण?
Rilee Rossouw gun shot celebration
PBKS vs RCB : विराट कोहलीने रायली रुसोच्या सेलिब्रेशनची नक्कल करत दिले चोख प्रत्युत्तर, VIDEO व्हायरल
mi vs kkr ipl 2024 i am not the only bowle Mitchell Starc takes sly dig at critics
“मी एकटाच नाही; जो…” MI VS KKR सामन्यानंतर मिशेल स्टार्कने ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर, म्हणाला, सर्व गोष्टी इच्छेनुसार…
How Chennai Super Kings Qualify for Playoffs
IPL 2024: चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये जाणार? पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर ही आहेत समीकरणं
Good news for LSG team Mayank Yadav available for match against Mumbai
Mayank Yadav : लखनऊसाठी आनंदाची बातमी, ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी झाला फिट
Tim David's Six Hits Fan On His Face
DC vs MI : टीम डेव्हिडच्या षटकाराने चाहता झाला जखमी, झेल घेण्याच्या नादात तोडांवर आदळला चेंडू

झालं असं की भुवनेश्वर कुमारने भारतीय गोलंदाजीचं नेतृत्व करत पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकला. सलामीला उत्तम गोलंदाजी करणाऱ्या मोजक्या जलदगती गोलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या भुवनेश्वरने आऊट स्वींग होणारा चेंडू ऑफ स्टम्पच्या थोडा बाहेर टप्पा पडेल असा टाकला. हा चेंडू सालमीवीर विस्ले माधविरेने ऑफ साइडला टोलवला. मात्र तो चेंडू थेट विराटच्या हातात स्थिरावला. विराटने चेंडूच्या दिशेने झेप घेत भन्नाट झेल टीपला. यानंतर विराट खाली बसूनच हसत होता. नंतर इतर त्याने इतर सहकाऱ्यांसोबत विकेट साजरी केली.

नक्की वाचा >> Ind vs Eng Semifinal: भारत १० तारखेला इंग्लंडशी भिडणार! आकडेवारीचा कौल भारताच्या बाजूने, २२ वेळा आमने-सामने आले त्यापैकी…

इतक्या सहज पहिला खेळाडू बाद झाल्यानंतर संपूर्ण संघाने विराटचं कौतुक करत सेलिब्रेशन केल्यानंतर विराटने बाद झालेल्या फलंदाजाकडे पाहून सॅल्यूट करत विकेट साजरी केली. या सेलिब्रेशनला सॅल्यूट सेलिब्रेशन असं म्हणतात. विराटचा हा सॅल्यूट करताना व्हिडीओ आयसीसीनेही इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केला आहे. तुम्हीच पाहा विराटचं हे अनोखं सेलिब्रेशन आणि त्याहूनही अनोखा असा झेल…

नक्की वाचा >> World Cup Final: भारत जिंकला! पाकिस्तानही उपांत्य फेरीत; Ind vs Pak ड्रीम फायनल्सची शक्यता वाढली; समजून घ्या नेमकं गणित

झिम्बाब्वेला पराभूत करुन भारताने दुसऱ्या गटात अव्वल स्थान कायम राखत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता भारताचा पुढील सामना इंग्लंडविरोधात १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. या सामन्यामध्येही विराटच्या बॅटमधून धावांची बरसात होईल अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे.

नक्की वाचा >> World Cup 2022: “…तोच संघ वर्ल्डकप जिंकेल”; भारतीय संघाचा उल्लेख करत Semi-Finals आधी स्टुअर्ट ब्रॉडचं सूचक विधान

सॅल्यूट सेलिब्रेशनचा अर्थ काय?
वेस्ट इंडिजच्या शेल्डन कॉट्रेलनं क्रिकेटमध्ये या सॅल्यूट सेलिब्रेशनचा ट्रेण्ड सुरु केला. “हा लष्करातील सॅल्यूटप्रमाणे आहे. मी पेशाने सैनिक आहे. त्यामुळे विकेट घेतल्यानंतर मी सॅल्यूट करुन जमैकाच्या सुरक्षा दलांप्रती मला वाटणार अभिमान व्यक्त करतो,” असं कॉट्रेलनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र नंतर हा सॅल्यूट क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी वापरला. सामान्यपणे बाद झालेल्या खेळाडूला निरोप देण्यासाठी झेल पकडणारा किंवा त्याला बाद करणारा गोलंदाज असा सॅल्यूट करतो. विराटने यापूर्वी २०१९ मध्ये कॉट्रेलचा झेल पकडल्यानंतर त्याला मैदानात सॅल्यूट केला होता. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनेही कॉट्रेलला बाद केल्यानंतर एकदा असाच सॅल्यूट त्याला केला होता.