IND vs SA Highlight: टी २० विश्वचषकात आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकून भारताने आजच्या सामन्यात सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता मात्र भारताचा कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार के. एल. राहुल, माजी कर्णधार विराट कोहली, अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या या सगळ्यांचे डाव फसले. अशावेळी सूर्यकुमार यादव भारतासाठी हुकुमी एक्का ठरला. सूर्यकुमारच्या ४० चेंडूत ६८ धावांच्या बळावर भारताने १३३ धावांचे लक्ष्य उभे केले. सूर्यकुमार यादवच्या या तुफानी खेळीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र जेव्हा भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने सूर्याचे कौतुक केले तेव्हा मात्र त्याच्या वक्त्यावरून विराट कोहलीचे चाहते भलतेच भडकले आहेत.

सूर्यकुमार यादवच्या खेळाचे कौतुक करताना गौतम गंभीरने ही आपण आजवर पाहिलेली सर्वात कमाल खेळी असल्याचे म्हंटले. तसेच टी २० मालिकांमध्येकोणत्याही भारतीय खेळाडूची ही सर्वोत्तम खेळी असल्याचेही गंभीरने म्हंटले. अनेक खेळाडू शतक, अर्धशतक ठोकतात मात्र अशा प्रकारचे खेळ कोणालाही शक्य होत नाहीत असे गंभीरने म्हणताच ही गोष्ट विराट कोहलीच्या चाहत्यांच्या जिव्हारी लागली आहे.

सूर्यकुमारचं कौतुक, कोहलीला टोला

गौतम गंभीर हा भारत विरुद्ध पाकिस्तान तसेच भारत विरुद्ध नेदरलँड या सामन्यातील विराट कोहलीचे योगदान झाकण्यासाठी सूर्यकुमारचे कौतुक करत आहे असाही आरोप कोहलीच्या चाहत्यांनी केला आहे.

IND vs SA: टीम इंडियाचा तळपता सूर्या! सूर्यकुमार यादवने सांगितलं तुफानी खेळीचं गुपित, म्हणाला, “मी रबरी बॉल..”

अनेकांनी गंभीरवर ताशेरे ओढून प्रत्येक खेळाडूची कोहलीशी तुलना करण्याची गरज नाही असाही सल्ला दिला आहे.

दरम्यान, आजच्या सामन्यात जरी विराट कोहली अवघ्या १२ धावांवर बाद झाला असला तरी मागील दोन सामन्यात टीम इंडियाचा खेळ सावरण्यात कोहलीचे मोठे योगदान आहे. विशेष म्हणजे भारत विरुद्ध नेदरलँड या सामन्यात कोहलीसह सूर्यकुमार यादवनेच सुंदर भागीदारी दाखवली होती.