Rahul Dravid Consoling Virat Video Viral : आयसीसी टूर्नामेंटचा रेकॉर्ड धारक विराट कोहली २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्येही फ्लॉप ठरला. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील शानदार सामन्यात सर्वांच्या नजरा कोहलीवर खिळल्या होत्या. पण विराट क्लीन बोल्ड झाला. यानंतर तो खूपच निराश असल्याचा दिसला. या स्पर्धेतील ७ सामन्यांमध्ये विराटने दुहेरी आकडाही पार न करण्याची ही चौथी वेळ आहे. उपांत्य फेरीत विकेट गमावल्यानंतर विराट ड्रेसिंग रूममध्ये निराश दिसत होता, त्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याला धीर दिला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचबरोबर चाहते राहुल द्रविडचे कौतुक करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट-द्रविडचा व्हिडीओ व्हायरल –

टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियामध्ये एक मोठा प्रयोग करण्यात आला. विराट कोहलीच्या फलंदाजीचा क्रमांक बदलण्यात आला आणि त्याला सलामीला पाठवले जात आहे. सलामीवीर म्हणून विराट कोहली पूर्णपणे फ्लॉप दिसत आहे. विराट दोन वेळा शून्यावर बाद झाला होता, तर त्याने ७ सामन्यांत केवळ दोन वेळा दुहेरी अंकात धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत कोहलीने अवघ्या ९ धावांत आपली विकेट गमावली. या सामन्यातील तिसऱ्या षटकात त्याला रीस टोपलीने क्लीन बोल्ड केले. क्लीन बोल्ड झाल्यानंतर विराट खूप निराश दिसत होता. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने ड्रेसिंग रूममध्ये त्याचे सांत्वन केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इंग्लंड संघाने गेल्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव केला होता. या वेळी भारताला मागील पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे विराटच्या विकेटनंतर युवा पंतलाही दुहेरी आकडा पार करण्यात यश आले नाही. मात्र, यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला. ज्यामुळे टीम इंडियाला ८ षटकात ६५ धावांपर्यत मजल मारता आली.

हेही वाचा – IND vs ENG : ‘आपण बुमराह-अर्शदीपवर अवलंबून असू तर…’, कपिल देवचा टीम इंडियाला महत्त्वाचा सल्ला, सांगितला १९८३ चा गेम प्लॅन ​​

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch virat kohli consoled by rahul dravid in dressing room after getting out against england in t20 wc 2024 semifinal vbm
Show comments