ट्वेन्टी२० वर्ल्डकपचे यजमान असलेल्या वेस्ट इंडिजने अनुनभवी युगांडाला ३९ धावांत गुंडाळत प्रचंड विजयाची नोंद केली. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना १७३ धावांची नोंद केली. अकेल हुसेनच्या फिरकीच्या बळावर यजमानांनी युगांडाला अर्धशतकही गाठू दिलं नाही. ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेत नीचांकी धावसंख्येच्या विक्रमाची युगांडाने बरोबरी केली. ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेतला धावांच्या फरकाने मिळवलेला दुसऱ्या क्रमांकाचा विजय आहे.

प्रोव्हिडन्स इथे झालेल्या लढतीत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जॉन्सन चार्ल्स आणि ब्रँडन किंग यांनी ४१ धावांची सलामी दिली. चार्ल्सने फटकेबाजी सुरु ठेवत ४४ धावांची खेळी केली. निकोलस पूरन (२२), रोव्हमन पॉवेल (२३) आणि शेरफन रुदरफोर्ड (२२) यांनी छोट्या पण उपयुक्त खेळी केल्या. आंद्रे रसेलने १७ चेंडूत ६ चौकारांसह ३० धावांची खेळी केली. युगांडातर्फे ब्रियान मसाबाने २ विकेट्स घेतल्या.

Sikandar Raza completes 2000 runs in t20 cricket
IND vs ZIM 4th T20I : सिकंदर रझाने रचला इतिहास, झिम्बाब्वेसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
India beat Zimbabwe by 10 wickets
IND vs ZIM 4th T20 : शुबमनच्या नेतृत्वाखाली युवा ब्रिगेड मालिका जिंकण्यात ‘यशस्वी’, झिम्बाब्वेचा १० विकेट्सनी उडवला धुव्वा
India vs Zimbabwe 4th T20I Live Cricket Score in Marathi
IND vs ZIM 4th T20 Highlights : टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने मालिकेत मारली बाजी, शुबमन-यशस्वीची अर्धशतकं
Yuvraj Singh explosive batting 28 balls 59 runs
WLC 2024 : ५ षटकार… ४ चौकार, युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाला करुन दिली जुन्या दहशतीची आठवण
Zimbabwe beat India by 13 runs in 1st T20 Match
झिम्बाब्वेची विजयी सलामी! विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची ‘यंग ब्रिगेड’ पहिल्याच सामन्यात ठरली अपयशी
IND vs SA Final Highlights T20 World Cup 2024 Updates in Marathi
IND vs SA Final Highlights : सूर्यकुमार यादवचा झेल ठरला निर्णायक! टीम इंडियाने १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर कोरलं नाव
Mitchell Starc and Marcus Stoinis Select Ultimate T20 Playing XI
IND v AUS: स्टार्क-स्टॉइनसच्या T20 संघात रोहित, सूर्या, जडेजापेक्षा धोनी-जहीरला पसंती, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?
Glenn Maxwell catch by Noor Ahmed in the Gulbadin Naib over
AFG vs AUS : ग्लेन मॅक्सवेलचा झेल ठरला अफगाणिस्तानच्या ऐतिहासिक विजयाचा ‘टर्निंग पॉइंट’, VIDEO होतोय व्हायरल

प्रत्युत्तरादाखल खेळताना युगांडाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. जुमा मियागीचा अपवाद वगळता युगांडाच्या बाकी फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. डावखुरा फिरकीपटू अकेल हुसेनने ४ षटकात ११ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट्स पटकावल्या. अल्झारी जोसेफने २ तर रोमारिओ शेफर्ड, आंद्रे रसेल, गुदकेश मोटी यांनी प्रत्येकी एक विकेट घेत हुसैनला चांगली साथ दिली. अकेललाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

वेस्ट इंडिजने पहिल्या लढतीत पापुआ न्यू गिनी तर या लढतीत युगांडावर दणदणीत विजय मिळवत बाद फेरीच्या दिशेने आश्वासक वाटचाल केली आहे.