Harleen Deol Catch Video Went Viral After Suryakumar Yadav Catch: भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावत आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आहे. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध रोमहर्षक सामन्यात ७ धावांनी विजय मिळवला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्याचे फोटो व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी सर्वाधिक चर्चेत असलेला व्हीडिओ आहे सूर्यकुमारचा यादवचा अविश्वसनीय झेल. सूर्यकुमार यादवने अखेरच्या षटकात सीमारेषेजवळ जबरदस्त झेल टिपला. आता यानंतर भारताच्या महिला क्रिकेट संघाच्या हरलीन देओलचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. हेही वाचा - “तो कधी सीमारेषेजवळ नसतो पण…”, सूर्यकुमारचा फायनलमधील कॅचबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, “रोहितकडे चेंडू फेकणार होतो” भारताला अखेरच्या षटकात ६ चेंडूत १६ धावा वाचवायच्या होत्या. हार्दिक पंड्या गोलंदाजीला आणि त्याने मिलरला पहिलाच चेंडू टाकला. मिलरने हार्दिक पंड्याच्या पहिल्या फुल टॉस चेंडूवर मोठा फटका मारला, हा चेंडू हवेत उंच उडाला आणि सीमारेषेच्या दिशेने गेला. तिथे सूर्यकुमार सीमारेषेच्या जवळ होता. क्षणभर असे वाटत होते की चेंडू सीमारेषा ओलांडून जाईल, पण सूर्यकुमारने कमालीची कामगिरी करत अप्रतिम झेल घेत संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवले. या कॅचनंतर हरलीनचाही असाच कॅच जो तिने २०२१ च्या सामन्यात टिपला होता तो व्हायरल होत आहे. हेही वाचा - T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण https://www.instagram.com/reel/C8zyacXoDBd/?utm_source=ig_embed&ig_rid=9432b012-2a09-439f-9177-69d8cad118a7 हरलीन देओलच्या कॅचचा व्हीडिओ व्हायरल २०२१ मध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये टी-२० मालिकेतील सामना नॉर्थम्ट्नमध्ये सुरू होता. यजमान इंग्लंडकडून एमी एलेन जोन्स २६ चेंडूत ४३ धावा करत फलंदाजी करत होती. तर भारताकडून शिखा पांडे गोलंदाज होती. जोन्सने शिखा पांडेचा चेंडू लाँग ऑफच्या दिशेने खेळला. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या हरलीनने आपले कौशल्य दाखवत झेल टिपण्यासाठी हवेत झेप घेतली. तिने बॉल पकडला आणि तिचा तोल जात असल्याचे तिला जाणवताच बॉल सीमारेषेबाहेर टाकला आणि ती सुध्दा सूर्याप्रमाणे सीमारेषेच्या पलीकडे गेली. पण त्यानंतर हरलीनने सीमारेषेच्या आत पुन्हा डाईव्ह घेत हवेत फेकलेला चेंडू टिपला. A similar catch like the one by Surya Kumar Yadav was taken by Harleen Deol. Hope we all remember?. pic.twitter.com/DakFietVAx— KV Iyyer - BHARAT ???? (@BanCheneProduct) June 30, 2024 हेही वाचा - IND vs SA: “…तेव्हा वाटलं ट्रॉफीचं बाऊंड्रीच्या पलीकडे जातेय”, सूर्याने सांगितली मिलरच्या मॅचविनिंग कॅचमागची गोष्ट; म्हणाला, “आता सगळं…” २०२१ मध्येही त्या सामन्यानंतर हरलीनच्या या कॅचचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता. महिला क्रिकेटमध्ये असा झेल पहिल्यांदाच टिपला गेला असेल, अशीही चर्चा त्यावेळी रंगली होती. सूर्यकुमारचा टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यातील या कॅचचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हरलीन देओलच्या या कॅचचा व्हीडिओ शेअर केला आहे. सूर्यासारखा झेल हरलीननेही पकडला होता, आठवतोय का; असे एका व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.