टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर ८ फेरीत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना होणार आहे. सुपर ८ फेरीतील भारताचा हा दुसरा सामना आहे. यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर ४७ धावांनी विजय मिळवला होता. आज होणाऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा पराभव केला, तर उपांत्य फेरीतील भारताचा प्रवेश जवळपास निश्चित होणार आहे. हा सामना आज (२२ जून रोजी) अँटिग्वा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम येथे खेळवला जाईल.

महत्त्वाचे म्हणजे या स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचे आतापर्यंतचे प्रदर्शन बघता भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत रोहित शर्मा विराट कोहली यांनी अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन केलेले नाही. विराट कोहलीला सलामीवीर म्हणून खेळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न फसल्याचे दिसून आलं आहे. रोहित-कोहली जोडीला सुरुवातीच्या काही षटकांमध्ये म्हणावे तसे प्रदर्शन करत आलेले नाही. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीला पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याची शक्यता आहे.

Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
ind vs aus t 20 cricket world cup 2024 super 8 match
Ind vs Aus T20 WC: सेमीफायनलचं गणित आकड्यांमध्ये अडकलं; भारतही पडू शकतो बाहेर, वाचा काय आहे नेमकं सूत्र!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Jay Shah on Rohit Sharma captaincy
टी-२०तून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत जय शाह यांची मोठी घोषणा; म्हणाले, “यापुढे तो…”
Rishabh Pant Medical Time Out Delayed The Game with Perfect Move
T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण
Kuldeep Yadav Marriage
कुलदीप यादव बॉलिवूड अभिनेत्रीशी लग्न करणार? वर्ल्डकप विजयानंतर स्वतःच केला खुलासा; म्हणाला…
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”

हेही वाचा – IND v AFG: “मी च्युइंग गम जोरात…” विराट कोहली बाद झाल्यानंतर सूर्यकुमार घाबरला होता? अर्धशतकी खेळीनंतर पाहा काय म्हणाला

विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर पाठवल्यास सलामीवीर म्हणून रोहित शर्माबरोबर यशस्वी जैस्वाल सलामीला येण्याची शक्यता आहे. यशस्वीला रविंद्र जडेजाच्या जागी संधी मिळू शकते. रविंद्र जडेलालाही या स्पर्धेत चांगली खेळी करता आलेली नाही.

याशिवाय या स्पर्धेत शिवम दुबेची कामागिरी सुद्धा सुमार दर्जाची राहिली आहे. आयपीएममधील त्याचा फॉर्म बघता, या टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र, यूएसएविरुद्ध झालेल्या सामन्यातील ३१ धावांची खेळी वगळता त्याला कोणतीही मोठी खेळी करत आली आलेली नाही. त्यामुळे या सामन्यात शिवम दुबेला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शिवम दुबेच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळेल, अशी चर्चा आहे. आयपीएलमधील संजू सॅमसनचं प्रदर्शनही चांगलं राहिलं आहे.

गोलंदाजीबाबत बोलायचं झाल्यास, भारतीय संघात काही बदल होईल, अशी शक्यता कमी आहे. वेस्टइंडीजमधील खेळपट्ट्या आतापर्यंत फिरकी गोलदाजांसाठी फायदेशीर राहिल्या आहेत. त्यामुळे कुलदीप यादवकडूनही आजच्या सामन्यात चांगल्या प्रदर्शनची अपेक्षा आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेशसाठी हा सामना महत्त्वाचा झाला आहे. सलामीवीर लिट्टन दास आणि तन्झिद खान यांच्या जोडीसह सुरुवातीच्या खेळाडूंची सुमार कामगिरी बांगलादेशसाठी डोकेदुखी राहिली आहे. या सामन्यात त्यांच्याकडून चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: एडन मारक्रमच्या अफलातून कॅचने फिरली मॅच; उत्कंठावर्धक लढतीत आफ्रिकेचा इंग्लंडवर ७ धावांनी विजय

बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाचे संभाव्य प्लेइंग ११ :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह