भारताने टी२० मालिकेत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून आयसीसी टी२० संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थानावरील पकड अधिक मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत भारतीय संघाने २-१ असा विजय मिळवला. मालिकेतील विजयामुळे संघाकडे सध्या २६८ गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील इंग्लंडच्या तुलनेत भारताने ७ गुणांची आघाडी घेतली आहे. या विजयानंतर भारताच्या खात्यात आयसीसी टी२० गुणतालिकेत आणखी एका गुणाची भर पडली आणि ते आता इंग्लंडपासून अजून पुढे गेले आहेत. दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी हा भारत दौरा महागात पडला आहे.

पाकिस्तान-इंग्लंड यांच्यात अजूनही तीन टी२० सामने होणार आहेत आणि त्यानंतर टी२० विश्वचषक स्पर्धा आहे. भारतही घरच्या मैदानावर विश्वचषकाआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामने खेळणार आहे. आफ्रिका व पाकिस्तान यांचे प्रत्येकी २५८ गुण आहेत आणि ते अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. सध्या भारतीय संघ आयसीसी टी२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावरील इंग्लंडकडे २६१  गुण आहेत. ऑस्ट्रेलिया संघ सहाव्या क्रमांकावर कायम आहे, पण त्यांना एका गुणाचे नुकसान नक्कीच झाले आहे. पाचव्या क्रमांकावरील न्यूझीलंडपेक्षा ऑस्ट्रेलियाकडे फक्त दोन गुण कमी आहे. न्यूझीलंड २५२ आणि ऑस्ट्रेलिया २५० गुणांसह अनुक्रमे पाच आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या खात्यात २६१ गुण आहेत. इंग्लंडला चौथ्या टी२० सामन्यात पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडकडे टी२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाच्या जवळ पोहोचण्याची संधी आहे. सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ७ सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. मालिकेत दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीवर आहेत. पाकिस्तान सध्या क्रमवारीत २५८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा   :  IND vs SA: ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिकेला हरविण्यासाठी टीम इंडिया सज्ज; जाणून घ्या संपूर्ण माहिती 

दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध तीन सामने जिंकून आगेकूच करू शकते. दक्षिण आफ्रिका देखील भारताविरुद्धच्या टी२० मालिकेत ही कामगिरी करू शकतो. टी२० क्रमवारीतील इतर संघांचा विचार केला, तर वेस्ट इंडीज सातव्या क्रमांकावर आहे. श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघ अनुक्रमे  ८, ९ आणि १० व्या क्रमांकावर आहेत.