१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक आयसीसी द्वारे जानेवारी २०२२ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये आयोजित केला जाईल. असे अनेक युवा खेळाडू या स्पर्धेत पाहायला मिळतील जे आगामी काळात वरिष्ठ पातळीवर आपापल्या संघाचे नेतृत्व करतील. त्यापैकी एक भारतीय वंशाचा ऑस्ट्रेलियन खेळाडू निवेथन राधाकृष्णन (Nivethan Radhakrishnan) यांचे नाव आहे.

ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या १५ सदस्यीय संघात निवेथनला स्थान मिळाले आहे. तो अष्टपैलू खेळाडू आहे. या मोसमातही त्याने तस्मानियासाठी शानदार खेळ दाखवत आपल्या बॅटने एकूण ६२२ धावा केल्या. याशिवाय त्याने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या अंडर-१६ संघासाठी पाकिस्तानविरुद्ध पाच सामन्यांची मालिकाही खेळली होती. जिथे त्याने १७२ धावा करत ८ विकेट्स घेतल्या.

( हे ही वाचा: नवरदेवाच्या संतापलेल्या भावाने विवाह सोहळ्यात वहिनीला मारायला केली सुरुवात; घटना कैमेऱ्यात कैद )

दोन्ही हातांनी गोलंदाजी

निवेथन राधाकृष्णन यांच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे तर, तो एक चांगला अष्टपैलू तसेच एक मिस्ट्री स्पिनर आहे. उजव्या हाताच्या ऑफ स्पिनसह डाव्या हाताची फिरकी फेकण्यातही तो माहिर आहे. आयपीएल २०२१ मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा नेट बॉलरही होता. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग आणि स्टीव्ह स्मिथ यांच्याकडून बरेच काही शिकले.

( हे ही वाचा: देसी जुगाड! शेतकऱ्याने भंगारातून बनवली अशी गाडी की त्यापुढे मोठे इंजीनियरही होतील फेल; बघा Viral Video )

‘असा’ आहे निवेथनचा प्रवास

निवेथन यांचा जन्म तामिळनाडूमध्ये झाला. यानंतर तो तमिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) फर्स्ट डिव्हिजन, तामिळनाडूची प्रतिष्ठित T20 लीगमध्ये स्वराज सीसीकडून खेळला आहे. त्याच बरोबर त्याला दोन वेळा वरिष्ठ स्तरावर TNPL च्या संघातही स्थान मिळाले आहे. यानंतर त्यांचे कुटुंब २०१३ मध्ये तामिळनाडूहून सिडनीला शिफ्ट झाले.

तस्मानिया टायगर्सचा भाग असलेल्या निवेथनचे अभिनंदन करणारे ऑस्ट्रेलियन फ्रेंचायझीने ट्विटरवर पोस्ट केले. या पोस्टमध्ये निवेथान राधाकृष्णनचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश झाल्याची माहिती देतानाच त्यांचे अभिनंदनही करण्यात आले आहे.

( हे ही वाचा: १८ वर्षांनंतर राहू मेष राशीत करेल प्रवेश , ‘या’ ४ राशीच्या लोकांच्या जीवनात आणेल आनंद आणि समृद्धी )

( हे ही वाचा: ब्लड शुगर सोबत काजू हाय बीपीही ठेवते नियंत्रित; जाणून घ्या इतर फायदे )

ऑस्ट्रेलिया अंडर-१९ विश्वचषक २०२२ चा संघ पुढीलप्रमाणे

हरकिरत बाजवा, एडन काहिल, कूपर कोनोली, जोशुआ गार्नर, आयझॅक हिगिन्स, कॅंबेल केलवे, कोरी मिलर, जॅक निस्बेट, निवेथन राधाकृष्णन, विल्यम साल्झमन, लचलान शॉ, जॅक्सन सेनफेल्ड, टोबियास स्नेल, टॉम व्हिटनी, टीग विली.