युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा : भारत उपांत्य फेरीत

यशस्वी, अथर्व यांच्या अर्धशतकी खेळीचे योगदान

यशस्वी जैस्वाल

यशस्वी, अथर्व यांच्या अर्धशतकी खेळीचे योगदान

पोचेफस्ट्रम : अथर्व अंकोलेकर याने चिवट झुंज देत फटकावलेले अर्धशतक आणि यशस्वी जैस्वालने साकारलेली अर्धशतकी खेळी यामुळे गतविजेत्या भारताने ऑस्ट्रेलियाला ७४ धावांनी हरवत १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

अंकोलेकर आणि यशस्वी यांच्या अर्धशतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ बाद २३३ धावा उभारल्या. हे आव्हान पार करताना कार्तिक त्यागीच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव १५९ धावांत गुंडाळला.

यशस्वीच्या ६२ धावांनंतरही भारताची स्थिती ६ बाद १४४ अशी स्थिती असताना रवी बिश्नोई आणि अथर्व यांनी सहाव्या गडय़ासाठी ६१ धावांची भागीदारी रचून भारताला दोनशे धावांचा पल्ला ओलांडून दिला. त्यानंतर अथर्वने अखेपर्यंत किल्ला लढवत ५४ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५५ धावांची खेळी साकारली. ऑस्ट्रेलियाच्या सॅम फॅनिंग याने ७५ धावा फटकावत कडवा प्रतिकार केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Icc u19 world cup india beat australia by 74 runs to reach semifinal zws

ताज्या बातम्या