आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय संघाचा मिताली राजच्या नेतृत्वाखाली पहिला सामना ६ मार्च रोजी होणार आहे. पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला वनडे विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध करणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सहा मार्च रोजी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या स्पर्धेची सुरुवात न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ४ मार्च रोजी होणाऱ्या सामन्याने होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. ३१ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण ३१ सामने खेळवले जाणार असून त्यात आठ संघ सहभागी होणार आहेत. पहिला उपांत्य सामना वेलिंग्टन येथे ३० मार्च रोजी होणार आहे. दुसरा उपांत्य सामना ३१ मार्चला तर विजेतेपदाचा सामना ३ एप्रिलला होणार आहे.

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ चा दुसरा उपांत्य आणि अंतिम सामना क्राइस्टचर्चच्या मैदानावर खेळवला जाईल. ही स्पर्धा राऊंड रॉबिन स्वरूपात खेळली जाईल, जिथे प्रत्येक संघाला इतर प्रत्येक संघाशी स्पर्धा करावी लागेल आणि गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. जिथे पहिल्या क्रमांकाच्या संघाला तिसऱ्या क्रमांकाच्या संघाशी आणि दुसऱ्या क्रमांकाच्या संघाला चौथ्या क्रमांकाच्या संघाचा सामना करावा लागेल.

हे संघ ठरले आहेत पात्र

आससीच्या म्हणण्यानुसार, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि भारत आयसीसी महिला चॅम्पियनशिप २०१७-२० मधील त्यांच्या स्थानांवर आधारित या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. तर, न्यूझीलंड या स्पर्धेचे यजमान असल्यामुळे या विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरले आहे. या विश्वचषकाचे सामने लीग फॉरमॅटमध्ये खेळवले जातील ज्यात आठही सहभागी संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. त्यानंतर अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

महिला विश्वचषकासाठी भारताचे वेळापत्रक

६ मार्च, भारत विरुद्ध पाकिस्तान, तौरंगा

१० मार्च, भारत विरुद्ध न्यूझीलंड, हॅमिल्टन

१२ मार्च, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, हॅमिल्टन

१६ मार्च, भारत विरुद्ध इंग्लंड, तौरंगा

१९ मार्च, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ऑकलंड

२२ मार्च, भारत विरुद्ध बांगलादेश, हॅमिल्टन

२७ मार्च, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, क्राइस्टचर्च

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc women world cup 2022 india women team face pakistan on march 6 abn
First published on: 15-12-2021 at 10:16 IST