आयसीसीद्वारे आयोजित करण्यात येणारा महिला टी-२० विश्वचषक २०२३ हा १० फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. यावेळी ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जात आहे. हा आठवा टी-२० विश्वचषक असून यामध्ये १० संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघ १२ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. हा सामना अतिशय रोमांचक आणि महत्त्वाचा असणार आहे. याआधी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने मोठे वक्तव्य केले आहे.

आयपीएल लिलाव नाही, तर टी-२० विश्वचषक महत्वाचा –

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने टी-२० विश्वचषक संघाच्या कर्णधारांच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही लिलावापूर्वी खूप महत्त्वाचे सामने खेळणार आहोत आणि आमचे लक्ष त्याकडे आहे.” ती म्हणाली, “हा विश्वचषक सर्वात महत्त्वाचा आहे. आमचे लक्ष आयसीसी ट्रॉफीवर आहे. या सर्व गोष्टी होत असतात. खेळाडूला त्याच्यासाठी काय महत्त्वाचे आहे आणि कसे लक्ष केंद्रित करावे हे माहित असते.”

Sanju Samson should be groomed as next T20 captain for India after Rohit says Harbhajan Singh
Team India : रोहितनंतर भारताचा टी-२० कर्णधार कोण होणार? हार्दिक-पंतकडे दुर्लक्ष करत हरभजनने सांगितले ‘हे’ नाव
Rohit Sharma's reaction to Dhoni Karthik
MS Dhoni : ‘धोनी अमेरिकेला येत आहे पण…’, टी-२० विश्वचषकापूर्वी रोहित शर्माचा मोठा खुलासा
IND vs BAN T20I 2024 Starts On 28th April Women Team India Take Revenge of Harmanpreet Kaur
IND vs BAN Women’s T20I ‘या’ दिवशी होणार सुरु; २०२३ मधील ‘त्या’ वादाचा बदला घेणार का हरमनप्रीतची सेना?
BCCI calls meeting of IPL team owners
IPL 2024 : स्पर्धेदरम्यान बीसीसीआयने अचानक बोलावली संघ मालकांची बैठक, महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता

ती पुढे असेही म्हणाली, ”आम्ही इतके परिपक्व आहोत की, आपल्यासाठी काय महत्त्वाचे आहे, हे आम्हाला कळते. कर्णधार हरमनप्रीतने या विधानासह स्पष्ट केले आहे की, त्यांच्यासाठी भारत-पाकिस्तान सामना आणि हा विश्वचषक आयपीएल लिलावापेक्षा कितीतरी पटीने अधिक महत्त्वाचा आहे.

हेही वााचा – Shaheen Ansha Wedding: ‘आमचा संस्मरणीय दिवस खराब करू नका…’; लग्नानंतर भडकलेल्या शाहीन आफ्रिदीचे ट्विटरवर आवाहन

या दिवशी असणार भारतीय संघाचे सामने –

भारतीय महिला संघाला या स्पर्धेत साखळी सामन्यात एकूण ४ सामने खेळायचे आहेत. त्यापैकी पहिला सामना १२ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध खेळला जाणार आहे. त्यानंतर १५ फेब्रुवारीला याच मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध सामना होणार आहे. पोर्ट एलिझाबेथ येथे अनुक्रमे १८ आणि २० फेब्रुवारीला इंग्लंड आणि आयर्लंडसोबत सामने होणार आहेत. भारतीय संघाचे हे सर्व सामने संध्याकाळी ६:३० आणि रात्री १०: ३० पासून खेळवले जाणार आहेत.

महिला विश्वचषकासाठी भारतीय संघ –

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.