WC 2019 : “वर्ल्ड कप बोल के बारीश दिखा रहे है बे”; सामना रद्द झाल्यानंतर भन्नाट मिम्स व्हायरल

भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे झाला रद्द

World Cup 2019 IND vs NZ : २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारत विरूद्ध न्यूझीलंड सामना अखेर पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे दोनही संघांना १-१ गुण देण्यात आला. या १-१ गुणामुळे न्यूझीलंड ४ सामन्यांत ७ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे, तर भारतीय संघ ३ सामन्यांत ५ गुणांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. आजचा सामना हा नॉटिंगहॅमच्या मैदानावर होणार होता. कालपासूनच या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार नाणेफेकीच्या नियोजित वेळेच्या आधीपासूनच पावसाने जोर धरला होता. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वा. ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खेळपट्टीची पाहणी आणि पावसाचा अंदाज घेण्यात आला. पण अखेर पावसाचाच जय झाला.

पावसामुळे रद्द झालेला हा आठवड्यातील तिसरा तर स्पर्धेतील चौथा सामना ठरला. यापैकी २ सामने हे श्रीलंकेच्या वाट्याला आले. तर भारत, न्यूझीलंड, बांगलादेश, आफ्रिका या संघाना एका सामन्यात पावसाचा फटका बसला. एकंदरीतच ‘पाऊस’ नाट्यावर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यातील काही भन्नाट मिम्स चांगलेच व्हायरल झाले.

पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने आश्वासक सुरुवात केली होती. पण सलामीवीर शिखर धवनला झालेल्या दुखापतीचा भारतीय संघाला या सामन्यात फटका बसण्याची शक्यता होती. शिखरच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल सलामीला फलंदाजीसाठी येईल, त्यामुळे त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोणता खेळाडू खेळेल आणि धवनच्या जागी कोणत्या खेळाडूला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात येईल? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र नाणेफेकही न झाल्याने हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले. भारताचा पुढील सामना १६ जूनला पाकिस्तानशी होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Icc world cup 2019 world cup match rain wash out memes viral

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या