scorecardresearch

Premium

World Cup 2023: ‘कॅप्टन डे’च्या आधी बाबर आझम रोहित शर्माला भेटला; म्हणाला, “मला घरापासून…”, Video व्हायरल

ICC World Cup 2023: बाबर आझमने विश्वचषक २०२३च्या ‘कॅप्टन डे’ दिनापूर्वी रोहित शर्माची भेट घेतली होती, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भारताचा पाकिस्तानशी १४ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे.

World Cup 2023: Babar Azam meets Rohit Sharma ahead of Captain's Day Said I don't feel so far from home Video viral
बाबर आझमने विश्वचषक २०२३च्या ‘कॅप्टन डे’ दिनापूर्वी रोहित शर्माची भेट घेतली होती. सौजन्य- (ट्वीटर)

ICC World Cup 2023: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने आयसीसी वन डे विश्वचषक २०२३च्या (कॅप्टन डे) कर्णधार दिनापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची भेट घेतली. ५ ऑक्टोबरपासून इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने विश्वचषक २०२३ सुरू होणार आहे. दुसरीकडे, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम वर्ल्ड कप २०२३ मध्ये ‘कॅप्टन डे’साठी अहमदाबादला पोहोचला, त्यानंतर त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. ‘कॅप्टन डे’च्या आधी बाबरने भारतीय कर्णधार रोहित शर्माबरोबर खास भेट घेतली होती, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बाबर आणि रोहितचा हा व्हिडीओ पीसीबीने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे.

World Cup: Will India win the World Cup after 12 years Captain Rohit Sharma's surprising statement Said I don't have an answer
World Cup: १२ वर्षानंतर भारत वर्ल्डकप जिंकेल का? कर्णधार रोहित शर्माचे आश्चर्यचकित करणारे विधान; म्हणाला, “माझ्याकडे उत्तर नाही…”
IND vs AUS: You didn't even call why did Amit Mishra say this to Rohit Sharma on commitment question Video during practice goes viral
IND vs AUS: “तुम्ही फोनही केला नाही…”, ‘कमिटमेंट’च्या प्रश्नावर अमित मिश्रा रोहित शर्माला असं का म्हणाला? सराव दरम्यानचा Video व्हायरल
Rohit Sharma's Embarrassing Record
IND vs BAN: रोहित शर्माच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, आशिया कपमध्ये ‘हा’ नकोसा कारनामा करणारा ठरला पहिला भारतीय
IND vs BAN: Rohit Sharma forgot the match against Nepal Hitman says, No chase in this Asia Cup series
IND vs BAN, Asia Cup: रोहित शर्मा नेपाळ विरुद्धची मॅच विसरला? हिटमॅन म्हणतोय, “या सीरिज मध्ये चेस…”

४ ऑक्टोबर रोजी विश्वचषक २०२३ मध्ये ‘कर्णधार दिन’ केला साजरा

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ साठी कर्णधार दिनाचे आयोजन अहमदाबादमध्ये करण्यात आले आहे, जेथे सर्व १० संघांच्या कर्णधारांचे अप्रतिम स्वागत करण्यात आले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, इंग्लिश कर्णधार जोस बटलर, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका, बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल हसन, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा, अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिद, नेदरलँड. कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स कॅप्टन डे मध्ये सहभागी झाले आहेत.

बाबर भारतात स्वागताने खूश

बाबर आझम म्हणाले, “भारतात आमचे चांगले स्वागत झाले. आम्हाला याची अपेक्षा नव्हती. प्रत्येकजण आनंद घेत आहे. हैदराबादमध्ये आपण भारतात आहोत असे वाटत नाही. आपण आपल्याच घरात आहोत असे वाटते. मला घरापासून लांब आहे असे वाटतचं नाही. विश्वचषकासाठी आम्ही सज्ज आहोत. आमची ताकद गोलंदाजी आहे. आमच्या संघातील बहुतांश खेळाडू गेल्या तीन वर्षांपासून एकत्र खेळत आहेत. याचा आम्हाला खूप फायदा होईल.”

हेही वाचा: Asian Games 2023: एशियन गेम्समध्ये भारताने रचला इतिहास! प्रथमच जिंकली ७० हून अधिक मेडल्स; १९५१ पासूनच्या पदकांची आकडेवारी

भारत-पाकिस्तान सामना नेहमीच मोठा: बाबर

भारताबरोबरच्या सामन्याबाबत बाबर म्हणाला, “भारताविरुद्ध खेळण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. १४ तारखेच्या सामन्यापूर्वी आम्हाला दोन सामने खेळायचे आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच मोठा असतो. यासाठी आम्ही तयार आहोत.”

बाबरला हैदराबादची बिर्याणी आवडायची

बाबर आझम यांना हैदराबादमधील स्वागत आणि बिर्याणीबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, “जेव्हापासून आम्ही हैदराबादमध्ये आलो आहोत, ज्या पद्धतीने आमचे स्वागत केले गेले त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. विमानतळापासून हॉटेलपर्यंत चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रेक्षकही स्टेडियममध्ये पोहोचले. जर आमचे प्रेक्षकही मोठ्या संख्येने आले असते तर बरे झाले असते. हैदराबादची बिर्याणी बऱ्यापैकी पाकिस्तानसारखीच आहे. इथे बिर्याणी खाताना छान वाटले.”

हेही वाचा: IND vs S. Korea Hockey: हॉकीत मेडल पक्क! भारताने कोरियावर ५-३ असा शानदार विजय मिळवत थेट अंतिम फेरीत मारली धडक

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबरला होणार आहे

आयसीसी विश्वचषक २०२३ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महान सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. मात्र, चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. विश्वचषक २०२३ उद्यापासून म्हणजेच ५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Icc world cup babar azam met rohit sharma before captains day video goes viral avw

First published on: 04-10-2023 at 17:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×