वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान कसोटी मालिका संपली आहे. वेगवान गोलंदाज शाहीन शाहच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा १०९ धावांनी पराभव केला. सबिना पार्क, जमैका येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजला विजयासाठी ३२९ धावांचे लक्ष्य मिळाले होते पण त्यांचा डाव २१९ धावांवर आटोपला. दोन्ही संघांमधील दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली आहे. यासह, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन गुणांची आकडेवारी जाहीर केली आहे.

डब्ल्यूटीसीच्या नवीन सीझनच्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघ अव्वल आहे. वेस्ट इंडिजच्या पराभवाचा फायदा भारतीय संघाला झाला आणि तो १४ गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. इंग्लंड दोन गुणांसह या यादीच्या तळाशी आहे.

फोटो सौजन्य- ICC

भारतीय संघ आयसीसी विश्व कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ गुणांच्या यादीत अव्वल आहे, कारण संघाने इंग्लडविरुद्ध एक सामना जिंकला आहे. तर भारताचा एक सामना अनिर्णित राहिला होता. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा संघ आहे, ज्याने एक सामना जिंकला. तिसऱ्या स्थानावर विंडीज संघ आहे, ज्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत विजयाचे खाते उघडले आहे. इंग्लंड संघ चौथ्या स्थानावर आहे, जो भारताविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. डब्ल्यूटीसीच्या या नवीन फेरीत इंग्लंडला आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही.

संघाची क्रमवारी गुणांच्या टक्केवारीनुसार केली जाते. विजयासाठी १२ गुण, टाय सामन्यासाठी सहा गुण, अनिर्णित सामन्यासाठी चार गुण आणि पराभवासाठी गुण दिले जात नाही.