Premium

World Cup 2024 : ‘जर हार्दिक थेट आयपीएल खेळला, तर…’; आशिष नेहराचे टी-२० विश्वचषकातील कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य

Ashish Nehra Statement : २०२३ च्या विश्वचषकादरम्यान हार्दिक पंड्याला दुखापत झाली होती. तेव्हा पासून हार्दिक पंड्या टीम इंडियातून बाहेर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही टीम इंडियात त्याचा समावेश नाही.

Ashish Nehra Statement about hardik pandya
हार्दिक पंड्या आणि आशिष नेहरा (फोटो-आयपीएल एक्स)

Hardik plays Straight IPL now it will be difficult for any selection committee : टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये टीम इंडियाचा कर्णधार कोण असावा? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यासाठी केवळ रोहित शर्माच्या नावाचा विचार केला जात असला, तरी हार्दिक पंड्याच्या नावाचीही जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, आयपीएलच्या मागील दोन हंगामात गुजरात टायटन्ससाठी हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून निवड करणारे प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी या चर्चेत एक महत्त्वाचे विधान केले आहे. जर हार्दिक थेट आयपीएल खेळणार असेल, तर संघ व्यवस्थापनासाठी त्याला कर्णधार बनवणे सोपे जाणार नाही, असे आशिष नेहराने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिओ सिनेमाशी बोलताना आशिष नेहरा म्हणाला, “मला कर्णधारपदाबद्दल माहिती नाही. अजून बराच वेळ बाकी आहे. निवडकर्त्यांसाठीही हे सोपे नसेल. हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त असून तो टीम इंडियात कधी परततो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जर हार्दिक आता थेट आयपीएल खेळला, तर कोणत्याही निवड समितीला त्याची कर्णधारपदी निवड करणे कठीण होईल.” हार्दिक पंड्या २०२३ च्या वर्ल्ड कप दरम्यान जखमी झाला होता. त्याला केवळ चार सामने खेळता आले. तो अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळेच तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यातूनही बाहेर राहणार आहे.

विराट-रोहित टी-२० विश्वचषक खेळणार की नाही?

यादरम्यान आशिष नेहराने विराट कोहली आणि रोहित शर्मा टी-२० विश्वचषक न खेळण्याच्या अफवांवरही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “जर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे खेळाडू फिट असतील, तर त्यांच्या फॉर्मबद्दल चर्चा करण्याची गरज नाही. कॅरेबियन आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकात ते नक्कीच उपस्थित असतील.”

हेही वाचा – IPL 2023 : ‘स्वीट मँगो’ स्टोरीबद्दल नवीन उल हकचा मोठा खुलासा, सांगितले विराट कोहलीशी काय होता संबंध?

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना डिसेंबरमध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मर्यादीत षटकांच्या दोन्ही फॉरमॅटसाठी संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. या दोन्ही खेळाडूंनी स्वत: दक्षिण आफ्रिकेत टी-२० आणि वनडे न खेळण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. यानंतर, अशी अटकळ बांधली जात होती की कदाचित हे दोन मोठे खेळाडू भविष्यात टीम इंडियाच्या टी-२० संघात क्वचितच दिसणार आहेत. हे दोन्ही दिग्गज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: If hardik plays straight ipl now it will be difficult for any selection committee to pick him as captain vbm

First published on: 02-12-2023 at 18:00 IST
Next Story
PAK vs AUS: पाकिस्तानी खेळाडू ट्रकमध्ये सामान चढवतानाचा VIDEO व्हायरल, चाहत्यांनी दोन्ही देशांच्या व्यवस्थापनाला फटकारले