scorecardresearch

Premium

Team India: श्रेयस अय्यर फिट नसेल तर विश्वचषकासाठी कोणाला मिळणार संधी? माजी खेळाडूने सुचवले ‘या’ फलंदाजाचे नाव

Wasim Jaffer on Tilak Verma: विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू दुखापतीशी झुंज देत आहेl. केएल राहुलपासून श्रेयस अय्यरपर्यंतचे प्रश्न अजूनही कायम आहेत. अशा स्थितीत त्यांच्या जागी कोणाला संधी द्यायची याबाबत सातत्याने चर्चा होत आहे.

Shreyas Iyer replaces Tilak Verma talk
टीम इंडिया (फोटो-ट्विटर)

Wasim Jaffer says Tilak Verma should be given a chance: भारताचा युवा फलंदाज तिलक वर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. या मालिकेत तो आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. तिसऱ्या सामन्यात तो ४९ धावा करून नाबाद राहिला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या तिलकचा विश्वचषकाच्या संघात समावेश करण्याबाबत आता अनेक दिग्गज बोलत आहेत. अशाच आता वसीम जाफरने तिलक वर्माबद्दल एक महत्त्वाच विधान केले आहे.

तिलक वर्माचा विश्चषकासाठीच्या टीम इंडियाच्या संघात स्थान दिले जावे, यासाठी आर आश्विन ते माजी निवडकर्ते एमएसके प्रसादपर्यंत आग्रही आहेत. टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत केएल राहुल ते श्रेयस अय्यर दुखापतीतून पूर्णपणे सावरलेले नाहीत. अशा स्थितीत २० वर्षीय तिलक वर्माला मधल्या फळीत संधी देण्याची चर्चा आहे. आता अजित आगरकर यांची निवड समिती तिलक वर्माला विश्वचषकात संधी देते की नाही हे पाहावे लागेल.

ICC ODI World Cup 2023 Updates
गोष्ट वर्ल्डकपची तुमच्या भेटीला
World Cup 2023 Updates
World Cup 2023: स्टुअर्ट ब्रॉडची विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारबद्दल मोठी भविष्यवाणी; म्हणाला, ‘या’ संघाला विश्वचषकात रोखणे कठीण
batball
खेळ, खेळी खेळिया : उसन्या उत्साहाची ‘नकोशी’ स्पर्धा!
Babar Azam's big Statement Before Coming to India for World Cup 2023 Said I believe in my own team players
Babar Azam: विश्वचषक २०२३साठी भारतात येण्यापूर्वी बाबर आझमचे सूचक विधान; म्हणाला, “मला माझ्याच खेळाडूंवर विश्वास…”

श्रेयस अय्यरच्या जागी तिलक वर्माला संधी देण्याची मागणी –

माजी भारतीय यष्टीरक्षक एमएसके प्रसाद म्हणाले की, मला वाटते ही वाईट कल्पना नाही, जर श्रेयस अय्यरने संघात स्थान मिळवले नाही. त्यानंतरच तुम्ही तिलक वर्माचा विचार करू शकता, पण मला खात्री आहे की भविष्यात मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये तो भारताचा नियमित खेळाडू असेल. भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरही तिलकला विश्वचषकासाठी संघात स्थान देण्याच्या बाजूने दिसला.

हेही वाचा – Fire: ईडन गार्डन्स स्टेडियमला ​​लागली आग, ड्रेसिंग रूममध्ये ठेवलेले सामान जळून खाक

क्रिकइन्फोशी बोलताना वसीम जाफरने सांगितले की, “आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कारण विश्वचषक सुरू होण्याआधी फक्त ९ सामने बाकी आहेत. तो म्हणाला की आदर्श परिस्थितीत खेळाडूला १५ ते २० सामने मिळावेत अशी आमची इच्छा आहे. श्रेयस आणि राहुल आशिया चषकासाठी तयार होतील अशी आम्हाला अपेक्षा होती, पण ते आशिया चषकासाठी तयार होऊ शकणार नाहीत हे आम्ही वाचत आहोत. ते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध असतील की नाही हे आम्हाला माहीत नाही. कारण त्यांची दुखापत किती गंभीर आहे, हे आम्हाला माहीत नाही.”

हेही वाचा – Team India: “…म्हणून ICC स्पर्धेत भारताला प्रबळ दावेदार मानतात”; अश्विनने केला विरोधी संघांच्या षड्यंत्राचा खुलासा

जाफर म्हणाला की, तुम्हाला खेळाडूची चाचणी घ्यायची असेल, तर तिलक वर्मा का नाही? खेळणारा कोणताही खेळाडू पुरेसा तयार होणार नसेल, तर मग तिलक वर्मा का नाही. मी त्याच्यावर पैज लावेन. तिलक वर्माने आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळलेल्या तीनही टी-२० सामन्यात शानदारी कामगिरी केली आहे. ३० ऑगस्टपासून आशिया चषक आणि ५ ऑक्टोबरपासून विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: If shreyas iyer doesnt recover from injury should tilak verma be given a chance says wasim jaffer vbm

First published on: 10-08-2023 at 11:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×