पॅरिस : अग्रमानांकित पोलंडच्या इगा श्वीऑटेकने आपले वर्चस्व कायम राखताना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पाच वर्षांत चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. गुरुवारी उपांत्य फेरीच्या लढतीत श्वीऑटेकने तिसऱ्या मानांकित अमेरिकेच्या कोको गॉफला ६-२, ६-४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. फ्रेंच स्पर्धेतील हा तिचा सलग २०वा विजय ठरला.

गतवर्षी अमेरिकन खुली स्पर्धा जिंकणाऱ्या गॉफला श्वीऑटेकसमोर फारसे आव्हान उपस्थित करता आले नाही. श्वीऑटेकने सामन्याची दमदार सुरुवात करताना पहिल्याच गेममध्ये गॉफची सव्‍‌र्हिस तोडली. त्यानंतर आपली सव्‍‌र्हिस राखताना तिने ३-१ अशी आघाडी घेतली. मग पुन्हा गॉफची सव्‍‌र्हिस तोडत श्वीऑटेकने सेटवरील पकड अधिकच घट्ट केली. यानंतर गॉफला पुनरागमन करता आले नाही आणि श्वीऑटेकने पहिला सेट सहज जिंकला.

novak djokovic into wimbledon semifinals without playing qf
नोव्हाक जोकोविच न खेळताच उपांत्य फेरीत
spain vs france semi final match preview
युरो अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज; आक्रमक स्पेनची फ्रान्सशी गाठफुटबॉल महासत्तांत वर्चस्वाची लढत
Netherlands in the semi finals of the Euro tournament after two decades
नेदरलँड्स दोन दशकांनी युरो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत; एका गोलची पिछाडी भरून काढत तुर्कीवर मात
England success in the shootout Entered the semi finals of the Euro tournament after defeating Switzerland sport news
इंग्लंडचे शूटआऊटमध्ये यश! स्वित्झर्लंडला हरवून युरो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक
Portugal knocked out by France in Euro Championship football sport news
फ्रान्सकडून पोर्तुगाल शूटआऊट; अखेरच्या युरो सामन्यात ख्रिास्तियानो रोनाल्डो अपयशी
Germany vs Spain and France vs Portugal match in Euro Championship football tournament sport news
बलाढ्यांतील द्वंद्वाची पर्वणी;युरो स्पर्धेत आज जर्मनीची स्पेनशी, फ्रान्सची पोर्तुगालशी गाठ
England beat Slovakia to reach the quarter-finals of the Euro Football Championship sport news
अलौकिक बेलिंगहॅमने इंग्लंडला तारले! स्लोव्हाकियाला नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
t20 cricket world cup final India vs south africa match preview
तुल्यबळांमध्ये वर्चस्वाची लढाई! ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या महाअंतिम लढतीत आज भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान

हेही वाचा >>>Pak vs USA: पाकिस्तानचं पानिपत; सुपर ओव्हरमध्ये अमेरिकेकडून पराभवाची नामुष्की

दुसऱ्या सेटमध्ये गॉफने सुरुवात चांगली केली होती. तिने चौथ्या गेममध्ये श्वीऑटेकची सव्‍‌र्हिस तोडताना ३-१ अशी भक्कम आघाडी घेतली. मात्र, श्वीऑटेकने ‘लाल माती’च्या कोर्टवर खेळताना आपले वेगळेपण पुन्हा सिद्ध केले. तिने पुढील तीन गेममध्ये गॉफची सव्‍‌र्हिस दोन वेळा मोडताना आणि आपली सव्‍‌र्हिस राखताना ४-३ अशी आघाडी मिळवली. यानंतर आपला चांगला खेळ सुरू ठेवत श्वीऑटेकने दुसरा सेट ६-४ असा जिंकत फ्रेंच स्पर्धेतील सलग तिसऱ्या जेतेपदाच्या आशा कायम राखल्या.

झ्वेरेवची आगेकूच

जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेल्या जर्मनीच्या अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेवने अ‍ॅलेक्स डी मिनौरचा ६-४, ७-६ (७-५), ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव करताना फ्रेंच खुल्या स्पर्धेत पुरुष एकेरीची सलग चौथ्यांदा उपांत्य फेरी गाठली.

बोपण्णा-एब्डेन जोडी गारद

भारताचा रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एब्डेन या दुसऱ्या मानांकित जोडीचे फ्रेंच खुल्या स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. बोपण्णा-एब्डेन जोडीला इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रेया वावासोरी जोडीने

५-७, ६-२, २-६ असे पराभूत केले.