पॅरिस : अग्रमानांकित इगा श्वीऑटेकने जपानच्या नाओमी ओसाकावर संघर्षपूर्ण विजय मिळवताना फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. महिलांमध्ये दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्का आणि कझाकस्तानच्या एलिना रायबाकिनाने, तर पुरुषांमध्ये इटलीचा यानिक सिन्नेर आणि पाचवा मानांकित डॅनिल मेदवेदेव यांनीही तिसऱ्या फेरीतील स्थान निश्चित केले.

जेतेपदासाठी प्रमुख दावेदार असणाऱ्या पोलंडच्या श्वीऑटेकने माजी ग्रँडस्लॅम विजेत्या ओसाकावर ७-६ (७-१), १-६, ७-५ असा विजय मिळवला. सामन्यातील पहिला सेट श्वीऑटेकने जिंकला, पण तिला संघर्ष करावा लागला. दुसऱ्या सेटमध्ये ओसाकाने सहज बाजी मारत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्येही ओसाकाने वर्चस्व मिळवले होते. तिच्याकडे ५-२ अशी मोठी आघाडी होती. मात्र, यावेळी श्वीऑटेकने सलग पाच गेम जिंकत सामना आपल्या नावे केला. सबालेन्काने जपानच्या मोयुका उचिजिमाला ६-२, ६-२ असे सरळ सेटमध्ये नमवत आगेकूच केली. माजी विम्बल्डन विजेत्या रायबाकिनाने नेदरलँड्सच्या अरांतक्सा रसला ६-३, ६-३ असे सरळ सेटमध्ये नमवत तिसऱ्या फेरीत धडक मारली.

Maharashtra Kesari Wrestling Tournament Winner Prithviraj Mohol Reaction on shivraj rakshe
होय शिवराज राक्षेची एका बाजूची पाठ नक्कीच टेकली होती : पृथ्वीराज मोहोळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ranji Trophy 2025 Virat Kohli Declines Team Managers offer during Ranji Trophy Camp wins gearts for his simplicity vbm 97
Ranji Trophy 2025 : विराट कोहलीने रणजी सामन्यापूर्वी ‘या’ कृतीने जिंकली सर्वांची मनं, सर्वत्र होतय कौतुक
Jasprit Bumrah wins ICC Cricketer of the Year award 2024
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराह ठरला ICCच्या सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी, फलंदाजांच्या मांदियाळीत चमकला एकटा गोलंदाज
Yannick Sinner made a statement about achieving success on other surfaces after winning the American and Australian championships
अन्य पृष्ठभागांवरही यश आवश्यक -सिन्नेर
Results of the sixth exam for MahaRERA brokers announced
महारेराच्या दलालांच्या सहाव्या परीक्षेचा निकाल जाहीर, ७६२४ पैकी ६७५५ परीक्षार्थी उत्तीर्ण
Australian Open Tennis Tournament Madison Keys wins title
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा: मॅडिसन कीजची मोहोर
Australian Open 2025 Madison Keys stuns Aryna Sabalenka to win her first Grand Slam title
Australia Open 2025: मॅडिसन कीने सबालेन्काला नमवत जिंकलं पहिलं ग्रँडस्लॅम, विजयानंतर कोच असलेल्या नवऱ्याला मिठी मारत ढसाढसा रडली, पाहा VIDEO

हेही वाचा >>> क्रिकेटची खरी मजा ११ खेळाडूंनी खेळण्यातच!; ‘प्रभावी खेळाडू’च्या नियमाबाबत भारताचा यष्टिरक्षकफलंदाज जितेश शर्माचे मत

पुरुष एकेरीत सिन्नेरने फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्केवर ६-४, ६-२, ६-४ असा विजय मिळवला. मेदवेदेवला मिओमिर केचमानोविचविरुद्ध पुढे चाल मिळाली. मेदवेदेव ६-१, ५-० असा आघाडीवर असताना मिओमिरने सामना मध्येच सोडला. अॅलेक्झांडर झ्वेरेवने डेव्हिड गॉफिनवर ७-६ (७-४), ६-२, ६-२ असा विजय साकारला.

जोकोविचही तिसऱ्या फेरीत

अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आपली विजयी लय कायम राखताना फ्रेंच स्पर्धेची तिसरी फेरी गाठली. त्याने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत स्पेनच्या रोबेर्टो कारबालेस बाएनाला ६-४, ६-१, ६-२ अशा फरकाने पराभूत केले. सामन्यातील पहिल्या सेटमध्ये बाएनाने जोकोविचसमोर बाएनाने आव्हान उपस्थित केले. मात्र, या सेटमधील विजयानंतर जोकोविचने अधिकच खेळ उंचावत बाएनावर सहज मात केली.

Story img Loader