पॅरिस : पोलंडची अग्रमानांकित इगा श्वीऑनटेक आणि अनेक नामांकित टेनिसपटूंना नमवत आगेकूच करणारी चेक प्रजासत्ताकची बिगरमानांकित कॅरोलिना मुचोव्हा शनिवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या जेतेपदासाठी एकमेकांसमोर असतील.

महिला एकेरीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात मुचोव्हाने दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्काला नमवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. मुचोव्हाने या लढतीत सबालेन्काला ७-६ (७-५), ६-७ (५-७), ७-५ असे पराभूत करत प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. जानेवारीत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवणारी सबालेन्का तिसऱ्या सेटमध्ये ५-२ अशा भक्कम स्थितीत होती. मात्र, यानंतर तिने २४ पैकी २० गुण गमावले आणि त्यामुळे तिला सामना गमवावा लागला. त्यापूर्वी, मुचोव्हाने पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकला तर, दुसऱ्या सेटमध्ये सबालेन्काने बाजी मारत सामना बरोबरीत आणला. मुचोव्हाने यापूर्वी २०२१च्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. मुचोव्हाने आतापर्यंत केवळ एकमेव ‘डब्ल्यूटीए’ जेतेपद हार्ड कोर्टवर मिळवले आहे. तसेच, फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत यापूर्वी ती कधीही तिसऱ्या फेरीच्या पुढे गेलेली नाही. त्यामुळे अंतिम सामन्यात तिच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असेल.

Top 5 Oldest Player To Score A Century In IPL
IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार

अन्य उपांत्य सामन्यात, अपेक्षेनुसार श्वीऑनटेकने ब्राझीलच्या १४व्या मानांकित बिअट्रिझ हद्दाद माइआला ६-२, ७-६ (९-७) असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. या सामन्यात महिलांच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या श्वीऑनटेकने आपल्या शैलीत सुरुवात केली. आपल्या फटकांच्या जोरावर तिने पहिल्या सेटमध्ये हद्दादला पुनरागमन करण्याची कोणतीच संधी दिली नाही. श्वीऑनटेकने आरामात पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये हद्दादने आपला खेळ उंचावत श्वीऑनटेकसमोर आव्हान उपस्थित केले आणि सेट टायब्रेकपर्यंत नेला. मात्र, श्वीऑनटेक पुनरागमन करत सेटसह सामना जिंकला आणि सलग दुसऱ्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. श्वीऑनटेक गतविजेती असल्याने मुचोव्हाविरुद्धच्या सामन्यात ती जेतेपदाची प्रबळ दावेदार समजली जात आहे.

वेळ : सायं : ६.३० वा. ल्लथेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन २,५