IOC Statement on Imane Khelif Controversy: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये १ जुलै रोजी महिला बॉक्सिंग स्पर्धेतील एक सामना सध्या जगभरात चर्चेचा विषय आहे. ६६ किलो वजनी गटात इटलीची अँजेला कारिनी आणि अल्जेरियाची बॉक्सर इमेन खलीफ (Imane Khelif) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामना हा ४६ सेकंदात संपला. विशष बाब म्हणजे इमेन खलीफने अवघ्या ४६ सेकंदात हा सामना जिंकला. कारण इटालियन बॉक्सरने इमेनच्या अवघ्या दोन पंचनंतर रडत सामना सोडण्याचा निर्णय घेतला होता. इमानच्या पंचमुळे इटालियन बॉक्सरच्या नाकालाही गंभीर दुखापत झाली. यानंतर सुरू असलेल्या वादाबाबत आता आयओसीचे वक्तव्य समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 7: भारताच्या तिरंदाजी जोडीची कमाल, सलग दुसऱ्या विजयासह गाठली उपांत्य फेरी

गुरुवारी, १ जुलै रोजी इमेन खलिफने इटलीच्या अँजेलाचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यानंतर आता इमेनची नजर तिच्या पहिल्या ऑलिम्पिक सुवर्णपदकावर असेल. यापूर्वी, इमेन गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी टेस्टोस्टेरॉन चाचणी उत्तीर्ण करण्यात अयशस्वी ठरली होती, ज्यामुळे ती जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होऊ शकली नाही. इमेन पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुढील सामने खेळणार की तिच्यावर बंदी घातली जाणार, हा प्रश्न अनेकांच्या मनात होता, आता यावर ऑलिम्पिक संघटनेने उत्तर दिले आहे.

हेही वाचा – Paris Olympic 2024: कष्टाचं चीज झालं! ९ वर्षांपासून रखडलेली बढती, स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिक पदक जिंकताच रेल्वेला आली जाग; दिलं मोठं गिफ्ट

Imane Khelif वादानंतर ऑलिम्पिकमधील बॉक्सिंग सामने खेळणार की नाही?

सोशल मीडियावर यऑलिम्पिकमधील या प्रकाराबाबत अनेक चर्चा सुरू आहे आणि आता त्यामुळेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेला (IOC) वक्तव्य द्यावे लागले आहे. त्याच्या उत्तरात, IOC ने म्हटले आहे की “ऑलिंपिक गेम्स पॅरिस २०२४ च्या बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होणारे सर्व खेळाडू स्पर्धेच्या पात्रता आणि प्रवेश नियमांचे तसेच पॅरिस २०२४ बॉक्सिंग युनिट (PBU) द्वारे निर्धारित केलेल्या सर्व लागू वैद्यकीय नियमांचे पालन करतात. ऑलिम्पिक बॉक्सिंग स्पर्धेतील खेळाडूंचे लिंग आणि वय त्यांच्या पासपोर्टवर आधारित आहे.”

“हा नियम २०२३ युरोपियन गेम्स, आशियाई गेम्स, पॅन अमेरिकन गेम्स आणि पॅसिफिक गेम्सच्या बॉक्सिंग स्पर्धा, डकारमधील २०२३ आफ्रिकन पात्रता स्पर्धा आणि बुस्टो अर्सिझियो (ITA) आणि बँकॉक (THA), येथे आयोजित दोन जागतिक पात्रता स्पर्धांसह पात्रता कालावधी दरम्यान देखील लागू होतात. ज्यामध्ये १७२ राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या (NOCs), बॉक्सिंग रेफ्युजी टीम आणि वैयक्तिक तटस्थ खेळाडूंमधून एकूण १,४७१ विविध बॉक्सरचा समावेश होता आणि २ हजारहून अधिक पात्रता बाउट्समध्ये सहभागी झाले होते, असे आयओसीने निवेदनात म्हटले.”

हेही वाचा – Imane Khalif Controversy: पुरुष की स्त्री? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इमेन खलिफवरून मोठा वाद; प्रतिस्पर्धी महिला खेळाडूनं सामनाच सोडला!

IOC Statement on Imane Khelif: इमेन खलिफच्या वादावर ऑलिम्पिक संघटनेचं उत्तर

आयओसीने म्हटले आहे की, याआधी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या मनमानी निर्णयामुळे वादग्रस्त ॲथलीट इमेन खलिफ (Imane Khelif) या वादात अडकली आहे. याप्रकरणी ऑलिम्पिक समितीने स्पष्टीकरण दिले आहे. आयओसीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “इमेन खलिफ आयबीएच्या अचानक आणि मनमानी निर्णयाचा बळी ठरली आहे. गेल्या वर्षी जेव्हा जागतिक स्पर्धा संपणार होती, तेव्हा तिला अचानक अपात्र ठरवण्यात आले होते. हा निर्णय आयबीएच्या सीईओने घेतला होता .”

पीबीयू आणि आयओसीने गुरुवारी संयुक्त निवेदन जारी केले. ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला कोणताही भेदभाव न करता खेळाचा सराव करण्याचा अधिकार असल्याचे सांगण्यात आले. बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंनी पॅरिस २०२४ बॉक्सिंग युनिटने ठरवलेल्या वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन केले आहे. सर्व खेळाडूंचे लिंग आणि वय त्यांच्या पासपोर्टवर आधारित आहे. तर आता इमेन पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिची मोहीम सुरू ठेवणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imane khalif controversy ioc pbu gives bold statement on participation of biological male algerian boxer paris olympics 2024 bdg
Show comments