scorecardresearch

IND vs AUS: “आम्ही जातो आमुच्या गावा…”, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमनचे शतक अन् सोशल मीडियावर केएल राहुल झाला जबरदस्त ट्रोल

KL Rahul troll: चौथ्या कसोटीत शुबमन गिलने शतक करताच सोशल मीडियावर माजी उपकर्णधार केएल राहुलला ट्रोल केले गेले रिअ‍ॅक्शन पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

KL Rahul got trolled on social media as Shubman gill scored hundread in IND vs AUS 4th test check the reactions
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

Shubman Gill over KL Rahul: शनिवारी (मार्च) नरेंद्र मोदी स्टेडियमवर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा सलामीवीर शुबमन गिलने तुफानी शतक झळकावले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध माजी उपकर्णधार केएल राहुलच्या जागी त्याला स्थान देण्यात आले आहे. ऑफस्पिनर नॅथन लायनने शुबमन गिलला पायचीत केले. त्याने २३५ चेंडूत १२८ धावा केल्या. त्यात १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून अनेक संधी मिळूनही राहुल फॉर्ममध्ये झुंजत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा गिल सर्वात तरुण भारतीय ठरला हे पाहून सोशल मीडिया शांत राहू शकला नाही. भारतासाठी शुबमन गिलचे हे दुसरे कसोटी शतक होते. अशा खेळपट्टीवर जिथे फलंदाजांना त्यांच्या संधीचा पुरेपूर वापर करण्याची संधी होती, गिलने दोन्ही हातांनी संधी साधली आणि शतक ठोकून भारतासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान निश्चित केले.

तिसर्‍या दिवशी भारताची चांगली सुरुवात झाली. काल दिवस संपताना शुबमन गिल आणि रोहितने १० षटकात ३६ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवशी, ५८ चेंडूत ३५ धावा करून कुहनेमनने रोहितला झेलबाद केले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिलने तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. मात्र पुजारा ४२ धावा काढून बाद झाला. नंतर, गिल आणि कोहली भारतासाठी चांगले खेळत होते मात्र या तरुण खेळाडूला अनुभवी नॅथन लियॉनने बाद केले.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: शुबमन-विराटच्या खेळीने ऑस्ट्रेलियाला काढला घाम! तिसऱ्या दिवसअखेर भारत १९१ धावांनी पिछाडीवर

तत्पूर्वी, उस्मान ख्वाजाने ४२२ चेंडूत १८० धावांची जबरदस्त खेळी करून ऑस्ट्रेलियन संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले आणि कॅमेरून ग्रीननेही शतक झळकावले, हे त्याचे ऑस्ट्रेलियासाठी रेड-बॉल क्रिकेटमधील पहिले शतक आहे. स्टीव्ह स्मिथच्या संघाने पहिल्या डावात भारतीय गोलंदाजी आक्रमणाची मर्यादेपर्यंत कसोटी पाहत एकूण ४८० धावा केल्या. सध्या टीम इंडियाच्या तीन विकेट्सच्या बदल्यात २८९ धावा झाल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-03-2023 at 19:29 IST
ताज्या बातम्या