scorecardresearch

IND vs AUS 4th Test: विराट कोहलीला गवसला सूर! अहमदाबाद कसोटीत शतक झळकावत टीकाकारांची तोंडं केली बंद

भारत-ऑस्ट्रेलिया चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शानदार शतक झळकावत टीकाकारांना चोख प्रत्युतर दिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे हे आठवे शतक आहे.

In IND vs AUS 4th Test at Ahmedabad Virat Kohli finally scored a century after so long time & silenced the critics
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांची कसोटी मालिका सध्या २-१ अशी आहे. यातील पहिले दोन सामने भारताने जिंकले आहेत, तर तिसऱ्या कसोटीत भारताला ९ विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. अशात मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अफलातून शतक झळकावत त्याच्यावर टीका करणाऱ्या सर्वांना त्याने या खेळीतून चोख प्रत्युतर दिले. उभय संघातील चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, भारतीय संघाने ३५० धावांचा टप्पाही पार केला आहे.

बऱ्याच दिवसांपासून विराट कोहलीचे कसोटीमध्ये शतक आले नव्हते. तब्बल नोव्हेंबर २०१९ नंतर विराटच्या शतकासाठी त्याचे चाहते त्याच्या शतकी खेळीसाठी आसुलेले होते. आज बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटीत त्याने दाखवून त्याने मी अजूनही ‘किंग कोहली’च आहे. त्याने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतील ७५वे शतक असून कसोटीतील त्याचे २८वे आहे. त्याने त्याच्या शतकी खेळीत केवळ ५ चौकाराचा समावेश असून बाकी सर्व धावा त्याने पळून काढल्या आहेत. २४१ चेंडूत शतक साजरे केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सगळ्या प्रकारात त्याचे १६वे असून कसोटीमध्ये ८वे आहे.

पहिल्या सत्राचा खेळ चौथ्या दिवशी संपला. भारताचा स्कोर ३९५/५आहे. भारतीय संघ अजूनही ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा ८५ धावांनी मागे आहे. भारताचा निम्मा संघ ३९३ धावांवर तंबूत परतला आहे. भारताची पाचवी विकेट श्रीकर भरतच्या रूपाने पडली. भरतने पीटर हँड्सकॉम्बच्या हाती नॅथन लायनने झेलबाद केले. भरतने ८८ चेंडूंत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४४ धावा केल्या. त्याने विराटसोबत अर्धशतकी भागीदारी करून भारतीय संघाला चांगल्या स्थितीत आणले. दुसऱ्या सत्रात कोहली आपले शतक पूर्ण केले. त्याचबरोबर भारतीय संघाला वेगवान धावा करून ऑस्ट्रेलियाची आघाडी संपवायची आहे. साधारणतः हा सामना अनिर्णीत होणार असं दिसत आहे. जर भारताने आज दिवसभर फलंदाजी करून १५० धावांची आघाडी घेतली तर ऑस्ट्रेलियावर दबाव आणून सामना रोमांचक होऊ शकतो.

तत्पूर्वी, भारताच्या पहिल्या डावात शुबमन गिल याने पाहुण्या संघाच्या गोलंदाजांना घाम फोडत शतक साजरे केले. त्याने यावेळी तब्बल २३५ चेंडूंचा सामना केला आणि १२८ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने १ षटकार आणि १२ चौकारांचा पाऊस पाडला. त्याच्या या शतकामुळे भारताला चांगली लय मिळाली. त्याने यादरम्यान आधी रोहित शर्मा याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी रचली. तसेच, दुसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारा याच्यासोबत ११३ धावांची भागीदारी केली. विशेष म्हणजे, पुजारा (४२) बाद झाल्यानंतर त्याने विराट कोहली याच्यासोबत ५८ धावांची भागीदारी रचली.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: खळबळजनक! भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यावर होतं खलिस्तानींचं संकट? धमकीनंतर अहमदाबाद क्राइम ब्रांच अ‍ॅक्टिव मोडवर

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी ४८० धावांचा डोंगर उभारला. एवढे मोठे आव्हान उभे करताना त्यांच्या दोन खेळाडूंनी शतक साजरे केले. त्यात उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन यांचा समावेश आहे. ख्वाजाने ४२२ चेंडू खेळून १८० धावा चोपल्या. त्यात २१ चौकारांचाही समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त ग्रीनने १७० चेंडू खेळून ११४ धावा केल्या. या धावा करताना त्याने १८ चौकार मारले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2023 at 12:48 IST
ताज्या बातम्या