scorecardresearch

IND-W vs WI-W T20 WC: भारताची विजयी घौडदौड सुरूच! वेस्ट इंडीजवर सहा विकेट्सने मात, दीप्ती ठरली विजयाची शिल्पकार

भारत- वेस्ट इंडीज यांच्यातील टी२० विश्वचषकात खेळल्या गेलेल्या आजच्या सामन्यात हरमनब्रिगेडने शानदार प्रदर्शन करत सहा विकेट्सने विजय नोंदवला.

In IND-W vs WI-W T20 World cup match India's winning streak continues won by six wickets Deepti became the women of the match
सौजन्य- आयसीसी (ट्विटर)

India W vs West Indies W T20 World Cup Match Today, 15 February 2023: दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी२० विश्वचषकात भारतीय विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याला केपटाऊन येथे संपन्न झाला. टीम इंडियाने वेस्ट इंडीजवर सहा गडी राखून मात करत विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिला पुन्हा एकदा नाणेफेक जिंकण्यात अपयश आले. नाणेफेक जिंकलेल्या वेस्ट इंडीज संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यातून भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधानाने पुनरागमन केले. तर, पुणेकर अष्टपैलू देविका वैद्य हिलादेखील संघात संधी मिळाली होती.

केपटाऊन येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना वेस्ट इंडीजला ६ बाद ११८ धावांवर रोखले. अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्मा हिने तीन विकेट्स मिळवत भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली. याचबरोबर तिने भारतासाठी पुरुष व महिला क्रिकेटमध्ये मिळून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी२० बळी मिळवण्याचा कारनामा केला. तिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

वेस्ट इंडीज ठेवलेल्या ११९ धावांचे माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली. पहिल्या दोन षटकातच ५ चौकार मारत स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी कॅरेबियन गोलंदाजांवर बरसल्या. मात्र स्मृती १० धावांवर बाद झाली. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट खेळी करणारी जेमिमाह अवघ्या एका धावेवर बाद झाली. सलामीवीर शफाली वर्मा चांगल्या फॉर्मात होती मात्र खराब फटका खेळून ती बाद झाली. तिने २८ धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यष्टीरक्षक रिचा घोष यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. त्याच्या जोरावर भारताने विश्वचषकातला दुसरा विजय साकार केला. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३३ धावा करून बाद झाली तर रिचा घोष ४४ धावा करून नाबाद राहिली. वेस्ट इंडीजकडून करिश्मा रामहारकने सर्वाधिक २ तर हेली मॅथ्यूजने आणि चिनेल हेन्रीने प्रत्येकी १ विकेट घेतली.

हेही वाचा: IND-W vs WI-W T20 WC: दीप्ती शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा! टी२० मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारी बनली पहिली गोलंदाज

तत्पूर्वी, सध्या गोलंदाजीच्या शानदार फॉर्म मध्ये असलेल्या दीप्तीने या सामन्यात सर्व क्षणी गोलंदाजी केली. पॉवर प्ले, मधली षटके तसेच डेथ ओवर्समध्ये तिने गोलंदाजी केली. तिने आपल्या चार षटकांमध्ये केवळ १५ धावा देत तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यासोबतच तिने टी२० क्रिकेटमध्ये शंभर विकेट्स पूर्ण केले. अशी कामगिरी करणारी ती पुरुष व महिला मिळून पहिलीच भारतीय गोलंदाज ठरली.

या सामन्याचा विचार केल्यास भारतीय गोलंदाजांनी प्रथम गोलंदाजी संधी मिळाल्यावर वेस्ट इंडीज संघाला दबावात ठेवले. कर्णधार मॅथ्यूज दुसऱ्या षटकात बाद झाल्यानंतर टेलर व कॅम्पबेल यांनी ७३ धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर दीप्ती व इतर गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करताना वेस्ट इंडिजला ११९ पर्यंत मर्यादित ठेवले. दीप्ती व्यतिरिक्त पूजा वस्त्राकार व रेणुका सिंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा: IND vs AUS 2nd Test: ‘मिस्टर ३६०’ ला डच्चू? राहुल द्रविडने दिले दुसऱ्या कसोटीत बदलाचे संकेत

तिच्या आधी भारताची अनुभवी फिरकीपटू पुनम यादव हिने ९८ आंतरराष्ट्रीय टी२० बळी टिपलेले. या यादीमध्ये राधा यादव ६७ बळींसह तिसऱ्या स्थानी तर राजेश्वरी गायकवाड ५८ बहिण सह चौथ्या क्रमांकावर आहे. पुरुष क्रिकेटचा विचार केल्यास भारताचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल ९१ बळींसह पहिल्या क्रमांकावर दिसून येतो. तर, अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार हा ९० बळींसह दुसऱ्या व रविचंद्रन अश्विन ७२ बळींसह तिसऱ्या स्थानी काबीज आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2023 at 21:40 IST
ताज्या बातम्या