या वर्षात क्रिकेटमध्ये अनेक शानदार सामने पाहायला मिळाले. मात्र, टीम इंडियाची कामगिरी काही खास नव्हती. दोन मोठ्या स्पर्धांमध्ये संघाचा पराभव झाला. आशिया चषकात टीम इंडिया सुपर फोर फेरीतून बाहेर पडली, तर टी-२० विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सर्व पराभवानंतरही भारताला स्टार संघ नक्कीच मिळाला. तो म्हणजे सूर्यकुमार यादव.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूर्या या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ७४ षटकार ठोकले. या वर्षी आतापर्यंत इंग्लंडचा जोस बटलर आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने मारलेल्या षटकारांपेक्षा हे जास्त आहेत. २०२२ मध्ये, बटलरने ३९ षटकार मारले आहेत. तसेच मिलरने ३१ षटकार मारले आहेत.त्या दोघांचे मिळून ७० आहेत. सूर्यकुमारने यावर्षी एकूण ४४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यामध्ये त्याने ४०.६८ च्या सरासरीने आणि १५७.८७ च्या स्ट्राईक रेटने १४२४ धावा केल्या. सूर्याने एकूण ७६ षटकार लगावले आहेत.

निकोलस पूरन या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये ४४ सामन्यांत ५९ षटकार लगावलेत. त्याचबरोबर यूएईचा मोहम्मद वसीम ५८ षटकारांसह तिसऱ्या, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा ५५ षटकारांसह चौथ्या आणि रोहित शर्मा ४५ षटकारांसह पाचव्या स्थानावर आहे.

या वर्षात आतापर्यंत कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नावावर आहे. त्याने १४ सामन्यात २४ षटकार लगावलेत. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो १८ षटकारांसह आहे. श्रीलंकेचा दिनेश चंडिमल १५ षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहे.

हेही वाचा – Womens IPL: बीसीसीआयने मीडिया अधिकारांसाठी जारी केल्या निविदा; पाच वर्षांसाठी दाखवता येणार सामने

त्याचबरोबर वनडेमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. त्याने २१ सामन्यात ६८५ धावा करताना ७ षटकार लगावले आहेत. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने सर्वाधिक ६८ षटकार लगावले आहेत. यानंतर यूएईचा मोहम्मद वसीम ४३ षटकारांसह दुसऱ्या, वेस्ट इंडिजचा रोव्हमन पॉवेल आणि पापुआ न्यू गिनीचा टीपी उरा ३९-३९ षटकारांसह तिसऱ्या स्थानी आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In international cricket 2022 suryakumar yadav holds the record of hitting the most sixes with 74 vbm
First published on: 09-12-2022 at 20:43 IST